घरCORONA UPDATEधारावीत दिवसभरात ४२ नवे रूग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या ६३२वर!

धारावीत दिवसभरात ४२ नवे रूग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या ६३२वर!

Subscribe

आतापर्यंत धारावीत २०रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

धारावीत मागील तीन दिवसांमध्ये अडीचशेच्या जवळपास कोरोनाच्या रुग्णांची संख्या आढळून आलेली असतानाच सोमवारी या विभागात ४२ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील रुग्णांची संख्या ६३२वर पोहोचली आहे. सोमवारी पिवळा बंगला, धारावी क्रॉस रोड, मुकुंद नगर, सनाऊल्ला कंपाऊंड, धारावी पीसी. गोपाळ मिस्त्री चाळ, कुंभारवाडा चाळ,, सब्रीना बाई चाळ, शिव शक्ती नगर,  अबू बाकर चाळ, मुस्लिम नगर, ९० फुटी रस्ता, ६०फुटी रस्ता,  जलील कंपाऊंड, संत रोहिदास मार्ग, ट्रान्सिट कॅम्प, न्यू सिध्दार्थ नगर, उदय सोसायटी,शास्त्री नगर,  शहिद भगतसिंह नगर, सोना नगर आदी ठिकाणी दिवसभरात ४२ रुग्ण आढळून आले. तर आतापर्यंत धारावीत २०रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

जी-उत्तर  विभागातील माहिममधील गिरगावकर वाडी, सॉलिटेअर बिल्डींग, पोलिस कॉलनी आदी ठिकाणी ३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे माहिममधील कोरोनाग्रस्तांची संख्या ७१ वर पोहोचली आहे तर दादर परिसरात दिवसभरात ४ रुग्ण आढळून आले. डिसिल्व्हा रोडवरील मोहम्मद उमर बिल्डींग,  गुलमोहर वाडी, स्वराज सोसायटीत चार रुग्ण आढळून आले असून यामुळे दादरमधील कोरोनाग्रस्तांची संख्या ५४ वर पोहोचली आहे.

- Advertisement -

जी-उत्तर विभागातील दुसऱ्या विभाग निरिक्षकालाही कोरोना

धारावीत जेवणाच्या पाकिटांचे वितरण करणाऱ्या करनिर्धारण व संकलन खात्याचे विभाग निरिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असतान जी-उत्तर विभागातील अन्न वितरण करणाऱ्या अन्य एका विभाग निरिक्षकालाही कोरोनाची बाधा झाल्याची बाब समोर आली आहे. त्यांना कांदिवली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळत आहे.


हे ही वाचा – घरी परतणाऱ्या कामगारांच्या रेल्वे प्रवासाच्या खर्चावर रितेश देशमुखने दिली ‘ही’ प्रतिक्रीया!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -