घरताज्या घडामोडीमुंबईच्या जीवनवाहिनीवर जोरदार डल्ला

मुंबईच्या जीवनवाहिनीवर जोरदार डल्ला

Subscribe

गेल्या पाच वर्षांत मुंबईतील रेल्वेची मालमत्ता चोरीला गेल्याच्या ८३९ घटना घडल्या आहेत.

‘रेल्वे की संपत्ती आपकी है,’ अशा उद्घोषणा मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर आपण ऐकतो. मात्र, काही चोरट्यांनी ही उद्धोषणा फारच मनावर घेतली असून, धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच वर्षांत मुंबईतील रेल्वेची मालमत्ता चोरीला गेल्याच्या ८३९ घटना घडल्या आहेत. ज्यात मुंबई विभागातून २ कोटी २८ लाख ९० हजार रुपयांच्या रेल्वे मालमत्तेवर चोरांनी जोरदार डल्ला मारला आहे. तसेच यंदा जानेवारी या एका महिन्यात १३ चोरीच्या घटना घडल्या असून, तब्बल ७१ लाख ३३ हजार ६८९ रुपयांच्या मालमत्तेवर चोरांनी हात साफ केला आहे. रेल्वेनेच ही आकडेवारी दिली आहे.

पाच वर्षांत २ कोटी २८ लाखांची चोरी

रेल्वेची मालमत्ता, प्रवासी सुरक्षितची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे आहे. मात्र, रेल्वे प्रवासात होणार्‍या चोरीच्या घटना दिवसेंदिवस काही कमी होताना दिसून येत नाहीत. त्यातच आता रेल्वेच्या मालमत्ता चोरी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात २०१४ ला रेल्वेची २४ लाख ८ हजार ६९६ रुपयांची मालमत्ता चोरीला गेली होती. ज्यात रेल्वे पोलिसांनी १६९ चोरीची प्रकरणे दाखल केली आहेत. ज्यानंतर सतत रेल्वेच्या मालमत्तांवर लक्ष ठेवून उपायोजना रेल्वे सुरक्षा दलाकडून करण्यात आल्या. त्यामुळे २०१७ ला १३८ चोरीच्या गुन्ह्यांत फक्त ५ लाख ५२ हजार ८५७ रुपयांची चोरी झाली होती. त्यात सुद्धा पोलिसांना मोठे यश आले होते. मात्र, २०१८ पासून परिस्थिती जैसे थे झाल्याने चोरट्यांनी रेल्वेच्या परिसरातील मॅटेरील, लोखंड तसेच इतर रेल्वेचे साहित्य चोरुन ३२ लाख ९० हजार रुपयांची चोरी केली होती. मात्र, तेव्हापासून रेल्वे मालमत्ता चोरीचा ग्राफ काही कमी झालेला नाही. तसेच गेल्या २०१४ पासून ते जानेवारी २०२० पर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एकूण ८३९ चोरीच्या घटनांची नोंद आहे.

- Advertisement -

रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात उपायोजना करण्यात आल्या आहेत. ज्यात रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही, रेल्वे कारशेड आणि रेल्वे मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सतत रेल्वे सुरक्षा दलाकडून पेट्रोलिंग सुरु असल्यामुळे रेल्वेत चोरीच्या घटना कमी होत आहे.  -अश्रफ के.के., विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे

वर्ष प्रकरण मूल्य

2014 169 24,08696
2015 166 11,55,838
2016 138 28,23,409
2017 110 5,52, 857
2018 118 32,90,653
2019 125 55,24, 854
2020 (जाने) 13 71,33,689

- Advertisement -

एकूण 839 2,28,90,014


हेही वाचा – करोना संशयिताचा भारतातला पहिला मृत्यू


Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -