घरदेश-विदेशप्रँकसाठी वापरलं सॅनिटायझर, स्फोटात १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

प्रँकसाठी वापरलं सॅनिटायझर, स्फोटात १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

Subscribe

लहान मुलांच्या हातात देऊ नका सॅनिटायझरची बॉटल

कोरोनामुळे अनेक जण सध्या सॅनियझरचा वापर करतायतं. परंतु हे सॅनिटायझर खेळण्याची वस्तू म्हणून लहान मुलांच्या हातात देत असाल तर सावध. कारण सॅनिटायझरशी प्रँक करणे इंदूरमधील मुलाच्या जीवावर बेतले आहे. या शहरात सॅनिटायझरशी खेळ करताना स्फोट झाला आणि या स्फोटात १४ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष पांचाळ असे मृत मुलाचे नाव असून ७ जानेवारी ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. मृत मुलगा मित्रांसोबत बाहेर खेळत होता. परंतु खेळताना काही तरी भन्नाट करु अशी आयडीया त्यांच्या डोक्यात आली. आणि त्याने हातात सॅनिटायझरची बॉटल घेत माचिशची पेटलेली काडेपेटी त्यावर टाकलीय. यावेळी लगेच सॅनिटायझरने पेट घेतल्याने भीषण स्फोट झाला. या स्फोट मृत मुलगा गंभीररित्या भाजला गेला. त्याला त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आहे. परंतु स्फोटात ५० ते ५२ टक्के होरपळला असल्याने त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली. त्यानंतर त्याला उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्याने तासाभरातचं प्राण सोडले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करत आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या मुलांच्या हातात सॅनिटायझरची बॉटल देत असाल तर काळजी घ्या.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -