घरताज्या घडामोडी'चलो अॅप'वर बेस्ट प्रवाशांना 19 रुपयांच्या तिकिटात मिळणार 9 बसफेऱ्यांची मुभा

‘चलो अॅप’वर बेस्ट प्रवाशांना 19 रुपयांच्या तिकिटात मिळणार 9 बसफेऱ्यांची मुभा

Subscribe

बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सोमवार 26 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त प्रवाशांसाठी खास सवलत सुरू केली आहे. या सवलतीनुसार, १९ रुपयांच्या तिकिटावर 9 बसफेऱ्यांची मुभा असणार आहे.

बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सोमवार 26 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त प्रवाशांसाठी खास सवलत सुरू केली आहे. या सवलतीनुसार, १९ रुपयांच्या तिकिटावर 9 बसफेऱ्यांची मुभा असणार आहे. त्यामुळे 10 दिवसांत कधीही 9 बसफेऱ्यांचा प्रवास करता येणार आहे. (In Mumbai 9 Best Special Bus Rides In Just Rs 19 Ticket For 10 days of Navratri)

बेस्ट उपक्रमाच्या ‘चलो अॅप’वर प्रवाशांना 19 रुपयांच्या तिकिटावर 9 बसफेऱ्यांची मुभा असणार आहे. ही विशेष सुविधा प्रवाशांना 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या दिवसात उपलब्ध असणार आहे.

- Advertisement -

कशी असेल ही सवलत?

  • चलो अॅपवर बस अॅप उघडा.
  • चलो अॅपवर पासचा पर्याय निवडा.
  • त्यानंतर त्यातील दसरा ऑफर पर्याय निवडा.
  • यामध्ये प्रवाशांनी आपली माहिती भरा.
  • त्यानंतर डेबिट कार्ड, यूपीए, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगच्या साह्याने १९ रुपयांचे तिकीट मिळेल.
  • या तिकिटावर १० बसफेऱ्यांचा प्रवास करता येणार आहे.

वातानुकूलित, विनावातानुकूलित बस, हो हो बस तसेच विमान प्रवाशांसाठी चालवण्यात येणाऱ्या बसने या तिकिटावर प्रवास करता येणार आहे.

- Advertisement -

नुकताच बेस्टने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (T2) शहराच्या विविध भागांमध्ये रात्रभर विमानतळ बसेस चालवण्याचा निर्णय घेतला. ज्या प्रवाशांना मुंबई विमानतळावरून शहराच्या विविध भागात जायचे आहे ते बेस्टने सुरू केलेल्या विमानतळ बससेवेवर आपली जागा आरक्षित करू शकतात. 9 सप्टेंबरपासून मुंबई विमानतळावरून प्रवास करण्यासाठी आपली जागा आरक्षित करण्यासाठी BEST च्या चलो अॅपचा वापर करता येऊ शकतो.

बेस्टचे आसन कसे आरक्षित कराल?

  • BEST Chalo अॅप डाउनलोड करा आणि मार्ग 881, 882 किंवा 884 शोधा.
  • ‘रिझर्व्ह’ पर्यायावर टॅप करा.
  • पिकअप आणि ड्रॉप पॉइंट निवडा.
  • टाइम स्लॉट निवडा आणि ऑनलाइन पेमेंट करा.
  • त्यानंतर तुम्ही बसचा थेट मागोवा (ट्रॅक ठेवणे) घेऊ शकता.
  • बोर्डिंग झाल्यावर, तुमचे बुकिंग प्रमाणित करण्यासाठी कंडक्टरच्या मशीनवर तुमचा फोन टॅप करा.

बेस्ट बस सेवेचे सध्याचे मार्ग :

  • मार्ग 881: CSIA टर्मिनल 2 – बॅकबे बस डेपो
  • मार्ग 882: CSIA टर्मिनल 2 – जलवायू विहार, खारघर
  • मार्ग 884: CSIA टर्मिनल 1A – कॅडबरी जंक्शन, ठाणे

हेही वाचा – राज्यात मुलं चोरणाऱ्या टोळीबद्दल अफवा, पोलिसांकडून कारवाईचा इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -