Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग ठाण्याच्या संभाजी नगरमध्ये मेट्रोचे पिलर उभारताना नाला बुजवला

ठाण्याच्या संभाजी नगरमध्ये मेट्रोचे पिलर उभारताना नाला बुजवला

पूर्वीच पाण्याच्या प्रवाहाला अपुरी पडणारी वाट आता आणखीन लहान झाल्याने संभाजी नगरवर पाण्याखाली जाण्याची टांगती तलवार नागरिकांवर लटकत आहे

Related Story

- Advertisement -

भला मोठा नाला असतानाही मागील वर्षी संभाजी नगर पाण्याखाली आलेले होते. तर याच पाण्याच्या प्रवाहामुळे पाण्यात पडलेली एक मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र या दुर्दैवी घटनेतून पालिका प्रशासनाने काहीच बोध घेतला नाही. याउलट तक्रारदारांची साधी दखल  न घेतल्याने यावर्षी संभाजी नगर पाण्याखाली जाणार अशी शक्यताच निर्माण झालेली आहे. मेट्रोच्या पिलर निर्माणात संभाजी नगरचा मोठा नाला आज गटार झाला आहे. तरीही पालिका प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र आहे. ठाण्याच्या रॉयल चॅलेंज हॉटेलजवळ हा मोठा नाला होता. महामार्गाला समांतर मेट्रो धावणार असल्याने मेट्रोच्या पिल्लरचे काम सुरु आहे. मेट्रोचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मात्र मोठ्या नाल्याची गटार करून टाकली. मोठा नाला बुजवून पिल्लरचे काम करण्यात आलेले आहे.

पूर्वीच पाण्याच्या प्रवाहाला अपुरी पडणारी वाट आता आणखीन लहान झाल्याने संभाजी नगरवर पाण्याखाली जाण्याची टांगती तलवार नागरिकांवर लटकत आहे. संबंधित कामाबाबत अनेक तक्रारीही केल्या. मात्र ठाणे पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना काहीही सोयर सुतक नाही. दुर्घटना घडली कि चौकशी  समिती, श्रद्धांजली, आणि पुन्हा “येरे माझ्या मागल्या” अशीच परिस्थिती आणि कार्यपद्धती पालिका अधिकारी यांची आहे. पावसाळ्या पूर्वी नाल्याची सफाई करून गाळ काढा अशी मागणी आणि पाठपुरावा स्थानिक रहिवाशी करीत असतानाच मोठा नालाच चक्क गटार करून टाकल्याने आणि पाठपुराव्याची दखल घेतली जात नसल्याने रहिवासी आणि  स्थानिक कार्यकर्ते आणि नगरसेवकही हताश आहेत.

- Advertisement -

मोठा नाला हा बुजवत  आल्याने तो छोटा झाला. संभाजी नगरमधील पाणी निचऱ्याची आणि मुख्य प्रवाहाचा हा नाला आहे. पूर्वीच या नाल्यातून पाणी निचऱ्यासाठी  होणाऱ्या अडथळ्यामुळे संभाजी नगरमध्ये सातत्याच्या पाऊसाने घराघरात पाणी जाते. आता मेट्रोच्या पिल्लर मुळे आणखीन नाला छोटा करण्यात आला. त्यामुळे पाणी वाहण्याचा असलेला पाइपही छोटा टाकला. याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या आणि पाठपुरावाही केला. दाखल न घेतल्याने  पूरस्थिती निर्माण होण्याची दाट  शक्यता आहे. तक्रारी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने पाहणीही केली. मात्र अरुंद नाल्याचा प्रश्न अद्याप सुटला नाही आणि पावसाळा जवळ आला आहे.

-निर्मला शरद कणसे(स्थानिक  नगरसेविका)

- Advertisement -

सदर नाल्याबाबत मेट्रोच्या ठेकेदाराशी चर्चा झालेली आहे. त्यांना सदरच्या समस्येबाबत लेखी पत्र पाठविण्यात आलेले आहे. नाला छोटा झाल्याने उदभवणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आठ दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा नाल्याची पाहणी करणार आहे. सूचना केल्यानंतरही ठेकेदाराने समस्या सोडविली नाही नाला पूर्ववत केला नाही  तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

– रवींद्र खडताळे (ठाणे पालिका नगर अभियंता)

- Advertisement -