घरमुंबईअंगरियाच्या उद्घाटनात भाजप आमदाराला खुर्ची

अंगरियाच्या उद्घाटनात भाजप आमदाराला खुर्ची

Subscribe

सेनेच्या मंत्र्यांना उभे राहण्याची शिक्षा

प्रतिनिधी:-युती सरकारच्या सागरी प्रवासातील विविध योजनांचा भाग मानला जाणार्‍या अंगारिया या अलिशान क्रूझ सेवेच्या उद्घाटनप्रसंगी आमदाराला बसायला देऊन सेनेच्या मंत्र्याची खुर्ची न देता अवहेलना करण्यात आल्याबाबतचे प्रकरण आता खूपच तापले आहे. राज्य सरकारमधील गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांना मागील रांगेत उभे ठेवून आमदार आणि आणखी एका व्यक्तीला मुख्य कार्यक्रमात बसवण्याचा प्रताप करण्यात आला आहे. मानापमानाचे हे प्रकरण अंगाशी आल्यावर भाजपने हा सरकारी कार्यक्रम नसल्याने त्यात राजशिष्टाचार नव्हता, असा वादग्रस्त खुलासा केला आहे.

गेल्या आठवड्यात २० तारखेला अंगरिया या अलिशान पर्यटन बोटीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. फेरीव्हार्फ येथे आयोजण्यात आलेल्या या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय दळणवळणमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. हा विषय गृह विभागाशी संबंधित असल्याने या कार्यक्रमाला राज्याचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर उपस्थित होते. मुख्य कार्यक्रम ज्या ठिकाणी सुरू होता तिथे फडणवीस आणि गडकरी यांच्या सोबतीने राज्यमंत्री केसरकरही उपस्थित होते. पण प्रत्येक ठिकाणी राजकारण करणार्‍यांनी केसरकर यांना अक्षरश: दुर्लक्षित केले. फडणवीस आणि गडकरी यांच्या रांगेत आमदार असलेले राज पुरोहित बसले होते. मात्र केसरकरांना बसायला खुर्चीच देण्यात आली नाही.

- Advertisement -

हे चित्र दर्शवणारे फोटो व्हायरल होताच शिवसेनेत एकच खळबळ उडाली. सेनेच्या मंत्र्याला कस्पटासमान वागणूक देण्याचा हा प्रकार असल्याने सेनेकडून या घटनेचा निषेध करण्यात आला. शिवसेनेच्या वॉट्सअप आणि फेसबूक ग्रूपवर या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. केसरकर यांना देण्यात आलेल्या वागणुकीवर शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. केसरकर यांना मागच्या रांगेत उभं करण्यात आल्याचे छायाचित्रात दिसत आहे. दरम्यान हा शासकीय कार्यक्रम नव्हता त्यामुळे प्रोटोकॉल नव्हता असं भाजपच्या गोटातून खुलेआम सांगितले जात आहे. हे प्रकरण अंगाशी येणार असल्याचे दिसू लागल्याने भाजपचे नेते यावर बोलायचे नाव घेत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -