घरमुंबईडेंग्यू आजार अधिकच घातक; लसी निष्क्रिय

डेंग्यू आजार अधिकच घातक; लसी निष्क्रिय

Subscribe

व्हायरसच्या रुपाने डेंग्यू आणखी धोकादायक

डास चावल्याच्या संसर्गामुळे दरवर्षी हजारो रुग्ण डेंग्यू आजाराने त्रस्त होतात. या रोगामुळे अनेक जणांना प्राण गमवावे लागतात. खरंतर डेंग्यू डासांपासून होणाऱ्या आजारांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी जगात वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केलं जात आहे. काही देशांमध्ये तर डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी लसी देखील तयार करण्यात आल्या आहेत. पण, डेंग्यू डासानेही आपलं रुप बदलून तो अजून घातक बनल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी लसी निष्क्रिय

म्हणजेच डासांद्वारे माणसाच्या शरीरात जाणाऱ्या डेनवी १ व्हायरसचं रुपांतर डेनवी २ मध्ये झालं आहे. वैद्यानिक डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डेंग्यूच्या व्हायरसमध्ये झालेल्या बदलांमुळे त्याला अधिकच प्रबळ आणि घातक बनवलं आहे. हा व्हायरल घातक यासाठी आहे कारण, काही देशांनी डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी लसी तयार केल्या होत्या, त्या आता जुन्या (आऊटडेटेड) झाल्या आहेत. म्हणजेच डेनवी १ च्या प्रतिबंधासाठी लसी तयार केल्या गेल्या होत्या. पण, व्हायरस मध्ये झालेल्या बदलांमुळे आता त्या लसी माणसाला डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी निष्क्रिय ठरत आहेत.

- Advertisement -

व्हायरसच्या रुपाने डेंग्यू आणखी धोकादायक

घातक असणारा डेंग्यूचा डास आता आणखीनच घातक झाला आहे. ज्यामुळे, त्याच्यावर लसींचा प्रभाव होत नाही. ‘पीएलओएस’ पेथोजन्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासामधून ही बाब समोर आली आहे. या अभ्यासानुसार, डेंग्यू व्हायरसच्या रचनेत बदल झाला आहे. आधी व्हायरसची रचना गोल आकाराची होती. पण, आता तो ओबड-धोबड आकारात रुपांतरीत झाला आहे. संशोधन करणाऱ्यांच्या दृष्टीने या बदललेल्या व्हायरसच्या रुपाने त्याला आणखी धोकादायक बनवलं आहे आणि तो माणसाच्या शरीरावर वापरण्यात येणाऱ्या लसींवर भारी पडतोय. मुंबईतील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हा व्हायरस रुग्णाला लवकर बरा होऊ देत नाही.

“व्हायरसचा आकार बदलामुळे रोगाच्या लक्षणांमध्येही बदल जाणवतोय. डेंग्यूसाठी बनवलेल्या लसी व्हायरलसोबत लढण्यासाठी सक्षम नसल्याचं समोर आलं आहे. आता उपचारांमध्ये येणाऱ्या अडचणी कशा प्रकारे येतील हा तर अभ्यासाचा विषय आहे. रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होऊन त्यांना पुन्हा संसर्ग होत आहे. ही समस्या भविष्यात आणखी बिकट होईल.”

– डॉ. ओम श्रीवास्तव, संक्रमण रोगाचे विशेषज्ञ (जसलोक हॉस्पिटल)

- Advertisement -

व्हायरसच्या रुपाने आरोग्याच्या समस्येत वाढ

डेंग्यूसाठी नवीन लसी बनवण्याच्या वेळेस एका नव्या दृष्टीकोणातून काम करण्यात आलं आहे. ज्या अंतर्गत संशोधनकर्त्यांना डेंग्यू व्हायरस म्यूटेशन म्हणजेच परिवर्तनानुसार, आपला आकार बदलू शकतो आणि प्रोटीन्सचं आवरण स्वत:वर ओढून घेतो. ज्यामुळे, डेंग्यू व्हायरस अनेक प्रकारच्या लसींपासून बचाव करत आहे. डेंग्यू व्हायरस डेनवी २ डासांच्या शरीराचं तापमान २९ डिग्री सेल्सिअसवर असूनही गोलाकार स्थितीत जिवंत राहून आणखी विकसित होऊ शकतो. पण, जर त्याने माणसाच्या ३७ डिग्री सेल्सिअस तापमानात प्रवेश केला तर तो गोलाकार स्थितीतून ओबड-धोबड आकारात रुपांतरीत होतो. त्यामुळे तो रोगप्रतिकारशक्तीला भेदून आरोग्याच्या समस्या वाढवू शकतो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -