Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE नेस्को कोविड सेंटरमध्ये १ हजार ५०० नवीन बेडचे उद्घाटन

नेस्को कोविड सेंटरमध्ये १ हजार ५०० नवीन बेडचे उद्घाटन

नेस्को कोविड केंद्राची क्षमता आता ३ हजार ७०० बेड इतकी झाली

Related Story

- Advertisement -

गोरेगाव येथील नेस्को मैदानावर स्थित आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संचलित समर्पित भव्य कोविड आरोग्य केंद्रातील दुसऱया टप्प्याचा भाग म्हणून १ हजार ५०० रुग्णशय्यांचे लोकार्पण राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते  करण्यात आले. या रुग्णशय्यांमध्ये १ हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या नवीन क्षमतेसह नेस्को कोविड केंद्राची क्षमता आता ३ हजार ७०० बेड इतकी झाली आहे.

नेस्को कोविड केंद्रातील ‘ई’ सभागृहात एकूण १ हजार ५०० रुग्णशय्या कोविड बाधित रुग्णांवरील उपचारासाठी नव्याने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये १ हजार ऑक्सिजन बेड तर उर्वरित ५०० सर्वसाधारण बेड आहेत. प्रत्येक बेडला पंखा, लॉकर व खुर्ची पुरवण्यात आली आहे. आज २०० बेड कार्यान्वित करुन या सभागृहातील सेवेचा प्रारंभ करण्यात आला असून टप्प्या-टप्प्याने सर्व बेड कार्यान्वित केल्या जाणार आहेत.

- Advertisement -

‘ई’ सभागृहात एकूण सहा कक्ष आहेत. प्रत्येक कक्षामध्ये २५० ते ३०० बेड्सची क्षमता आहे. सर्व कक्षांमध्ये केंद्रीकृत वातानुकूलन सुविधा आहे. तसेच प्रत्येक कक्षामध्ये २ नर्सिंग स्टेशन, १ अन्न वितरण विभाग, १ अग्नि नियंत्रण कक्ष, समवेत २४ x ७ तत्त्वावर कार्यरत फार्मसी कौन्सिलिंग रूम, रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती पुरवण्यासाठी नियंत्रण कक्ष देखील आहे. एकूण ८ नोंदणी कक्ष, १ निरीक्षण कक्ष, १ क्ष-किरण विभाग कार्यान्वित करण्यात आले आहेत.
या नवीन सुविधेसाठी एकूण १ हजार १०० मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत. त्यात ५० सिनियर कन्सल्टंट, १६० निवासी वैद्यकीय अधिकारी, ३२० परिचारिका, ४८० रुग्णसेवा सहायक आणि ९० तांत्रिक कर्मचारीवर्ग यांचा समावेश आहे.

दरम्यान, नेस्को कोविड केंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण २ हजार २०० बेड कार्यान्वित करण्यात आले होते. त्यामध्ये २०० एचडीयू बेड्स तर ३०० ऑक्सिजन बेड होते. दुसऱ्या टप्प्यातील १ हजार ५०० बेडसह या केंद्राची एकूण क्षमता ३ हजार ७०० बेड इतकी झाली आहे. परिणामी, मुंबईतील कोविड बाधितांवरील उपचारांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत २ ऑक्सिजन सिलेंडर रिफिलिंग प्लँटच्या निर्मितीचा मुंबई पालिकेचा निर्णय

- Advertisement -