बेस्टच्या ‘चलो’ अॅप उपक्रमात उर्दू भाषेचा समावेश करा; आदित्य ठाकरेंकडे सपाच्या आमदाराची मागणी

Include Urdu language BEST's 'Chalo' app initiative; for SP MLA Demand Aditya Thackeray
स्टच्या 'चलो' अॅप उपक्रमात उर्दू भाषेचा समावेश करा; आदित्य ठाकरेंकडे सपाच्या आमदाराची मागणी

मुंबई -: बेस्टच्या ‘चलो’ अॅप उपक्रमामध्ये उर्दू भाषेचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पत्राद्वारे राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून नागरिकांचा बेस्टचा प्रवास सुखकर होण्यासाठी ‘चलो’ अॅपची सुविधा उपलब्ध केली आहे.

‘चलो’ अँपच्या माध्यमातून मुंबईकर नागरिकांना बेस्ट बसेस व रूट बाबतची माहिती मिळण्यास मदत होणार आहे . सदर उपक्रम हा अत्यंत स्तुत्य असून मी त्याचे स्वागत करतो असे आमदार शेख यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

या अॅपमुळे नागरिकांना प्रवास करण्यास फायदा होणार आहे. परंतु सदर उपक्रम बेस्टमार्फत राबवला जात असताना इंग्रजी, हिंदी, मराठी, तेलगू, तमिळ, इ . विविध भाषांचा वापर ‘ चलो’ ॲपमध्ये समाविष्ट केला आहे. मुंबई शहर हे बहुभाषिक शहर आहे . परंतु मुंबई शहरामध्ये उर्दू भाषा बोलणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे . मुंबई महापालिकेच्या उर्दू माध्यामांच्या अनेक शाळा मुंबई शहरात आहेत.

याबाबत अनेक नागरिकांनी माझ्याकडे लोकप्रतिनिधी या नात्याने बेस्टच्या ‘चलो’ अॅपमध्ये उर्दू भाषेचा समावेश का करण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित करून विचारणा करत आहेत, असे आ. शेख यांनी म्हटले आहे.