घरCORONA UPDATEमुंबईसह, ठाण्यातील ४२,५०० तळीरामांना एका दिवसात घरपोच मद्य सेवा

मुंबईसह, ठाण्यातील ४२,५०० तळीरामांना एका दिवसात घरपोच मद्य सेवा

Subscribe

मुंबई आणि ठाण्यातील तळीराम मद्यखरेदीसाठी सर्वात पुढे असून एका दिवसात ४२ हजार ५०० जणांना मद्याची घरपोच सेवा देण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात ‘सोशल डिस्टनिंग’च्या नियमाचे पालन करून राज्यभरात एका दिवसात ५१ हजार ७२८ तळीरामाना मद्याची घरपोच सेवा देण्यात आलेली आहे. मुंबई आणि ठाण्यातील तळीराम मद्यखरेदीसाठी सर्वात पुढे असून एका दिवसात ४२ हजार ५०० जणांना मद्याची घरपोच सेवा देण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिली. मागील दहा दिवसांत राज्यभरात ३लाख८३ हजार ३८३ तळीरामाना मद्याची घरपोच सेवा देण्यात आलेली असल्याचेही उमप यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवहार, उद्योगधंदे बंद करण्यात आले होते. राज्य शासनाने चौथ्या लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योगधंद्यात शिथिलता आणून सोशल डिस्टनिंगचे पालन करीत काही प्रमाणात व्यवहार सुरू केलेले आहेत, त्यात ५ मे रोजी मद्यविक्रीचा निर्णय घेण्यात आलेला असून मद्यविक्री मालकांनी दुकानात दारूची विक्री न करता ग्राहकांना मद्याची घरपोच सेवा देण्याचे आदेश जारी केले होते.

- Advertisement -

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण राज्यात मद्याची घरपोच सेवा देण्यात येत असून मागील दहा दिवसात राज्याभरात ३ लाख८३ हजार ३८३ तळीरामाना मद्याची घरपोच सेवा देण्यात आलेली असून सर्वात अधिक मद्यखरेदी ठाणे आणि मुंबईकर करीत असून बुधवारी एकाच दिवसात मुंबई आणि ठाणेतील ४२ हजार ५०० तळीरामाना घरपोच मद्य सेवा देण्यात आलेली असून राज्यभरात एका दिवसात ५१ हजार ७२८ ग्राहकांना घरपोच मद्य सेवा पुरवण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ७,१५२ अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने ३ मे  पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात १५ मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत असल्याचे आयुक्त उमप यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -