घरताज्या घडामोडीआता पालिका मुख्यालयातही पर्यटन 'सफर'

आता पालिका मुख्यालयातही पर्यटन ‘सफर’

Subscribe

१२५ वर्षांपेक्षाही जास्त जुन्या इमारतीचे दरवाजे पर्यटकांसाठी उघडणार

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील ब्रिटिशकालीन अनेक वास्तूंपैकी एक असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालयाच्या १२५ वर्षांपेक्षाही जास्त जुन्या हेरिटेज इमारतीचे दरवाजे पर्यटनाच्या दृष्टीने आता सर्वसामान्य नागरिक, मुंबईकर आणि पर्यटकांसाठी उघडले जाणार आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेच्या हेरिटेज इमारतीला पर्यटनाच्या क्षेत्रात उतरवले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २८ जानेवारी रोजी उद्घाटन केले जाणार आहे. याप्रसंगी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर किशोरी पेडणेकर, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री मंत्री अस्लम शेख, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पालिकेने उभारला ‘सेल्फी पॉईंट’

मुंबई शहराला पर्यटन क्षेत्रात पुढे आणण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबईचे आकर्षण हे देशी आणि विदेशी पर्यटकांना आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज इमारतीला लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. तसेच, मुंबई शहरातील अनेक हेरिटेज वस्तूंना पर्यटक भेटी देतात. पालिकेने आपल्या हेरिटेज इमारतीच्या बाह्य भागात चांगली विद्युत रोषणाई केली आहे. संध्याकाळच्या सुमारास ही विद्युत रोषणाई मुंबईकरांचे, पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. तसेच, या इमारतीसमोरच पालिकेने नव्याने एक ‘सेल्फी पॉईंट’ उभारला आहे. त्या ठिकाणी सकाळपासूनच मुंबईकर, पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देऊन आठवण म्हणून ‘सेल्फी’ काढतात.

- Advertisement -

या दिवशी करता येणार हेरिटेज इमारतीची सैर

पालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात ही हेरिटेज इमारत पर्यटनासाठी खुली होणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर गाईडच्या मदतीने मुंबई महापालिकेच्या हेरिटेज इमारत पर्यटकांना पाहता येणार आहे. दर आठवड्यातील शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पालिका हेरिटेज इमारतीची सैर करता येणार आहे.


हेही वाचा – लग्नसमारंभाचे हॉल, सिनेमागृहे, स्विमिंग पूल क्षमतेत ५० टक्क्यांपर्यंत वाढ, केंद्राची नवीन नियमावली जाहीर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -