घरताज्या घडामोडीBMC स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड

BMC स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड

Subscribe

केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर मुंबईतील शिवसेनेचे नेते असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाचे पथक आज सकाळी दाखल झाले आहे. आयकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी चौकशी सुरू आहे. माहितीनुसार, बेनामी संपत्ती प्रकरणी आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकल्याचे म्हटले जात आहे. यादरम्यान जाधव यांच्या घराबाहेर सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनंतर शिवसेनेचे आणखीन एक नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असल्यामुळे हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानले जात आहे. सध्या यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाकडून कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. माहितीनुसार, १५ कोटींचा व्यवहाराचे कागदपत्र काही महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांकडून आयकर विभागाला देण्यात आले होते. पालिकेतील कोविड घोटाळ्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणी आयकर विभागाचे पथक आज सकाळी यशवंत जाधव यांच्या घरी पोहोचले आहे. पण अद्याप अधिकृतरित्या आयकर विभागाकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही. पण या प्रकरणात इतर यंत्रणांना घेऊन कारवाई केली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी ई़डीने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर काल, गुरुवारी मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयच्या शेजारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धरणे आंदोलन केले. यात यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव देखील उपस्थित होत्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने धाड घातली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचवल्या आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचे मौनव्रत !


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -