घरCORONA UPDATECoronaVirus: मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा १००च्या उंबरठ्यावर!

CoronaVirus: मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा १००च्या उंबरठ्यावर!

Subscribe

मुंबईतील कोरोनाचा आकडा ८० वरून ९६वर पोहोचला आहे.

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. आतापर्यंत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३०२ वरून ३२०वर पोहोचली आहे. राज्यात १८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी मुंबईत १६ तर पुण्यात दोन नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा ८० वरून ९६वर पोहोचला आहे. सध्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा १००च्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे मुंबईची परिस्थिती आणखीन चिंताजनक होत आहे.

आज मुंबईत आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. एका ७५ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनामुळे नऊ जणांचा बळी गेला आहेत. तसंच डोंबिवलीतील महिलेचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही महिला ऑस्ट्रेलियाहून भारतात परतली होती. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची मृतांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे १३ जणांचे बळी गेले आहेत.

- Advertisement -

जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. आतापर्यंत ८ लाख ६४ हजार ६९० कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४२ हजार २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच कोरोनामुळे १ लाख ७६ हजार ४०३ जणांचा रिकव्हर झाले आहेत.


हेही वाचा – ‘लॉकडाऊन’दरम्यान बाळाचा जन्म; नाव ठेवलं ‘लॉकडाऊन’!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -