घरताज्या घडामोडीमुंबईत पाणी, कचरा, शौचालयांबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ; दरमहा सरासरी 8000 तक्रारी

मुंबईत पाणी, कचरा, शौचालयांबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ; दरमहा सरासरी 8000 तक्रारी

Subscribe

मुंबईत वाढत्या लोकसंख्येबरोबरच नागरी समस्यांबाबतही तक्रारींचा पाढा मुंबईकर वाचत आहेत. मुंबई महापालिकेकडून मुंबईला रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, उद्याने, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज आदी विविध सुविधा देण्यात येतात. गेल्या २०१२ ते २०२१ या दहा वर्षांच्या कालावधीत नागरी समस्यांबाबत पालिकेकडे एकूण ९,४६,२५३ तक्रारी आल्या आहेत.

मुंबईत वाढत्या लोकसंख्येबरोबरच नागरी समस्यांबाबतही तक्रारींचा पाढा मुंबईकर वाचत आहेत. मुंबई महापालिकेकडून मुंबईला रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, उद्याने, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज आदी विविध सुविधा देण्यात येतात. गेल्या २०१२ ते २०२१ या दहा वर्षांच्या कालावधीत नागरी समस्यांबाबत पालिकेकडे एकूण ९,४६,२५३ तक्रारी आल्या आहेत. यामध्ये, २०१५ ला ६७,८३५ तक्रारी असताना २०१९ ला तक्रारींचे प्रमाण १,२८,१४५ वर गेले. २०२० व २०२१ मध्ये कोविड असतानाही तक्रारींचे प्रमाण अनुक्रमे ९३,७७४ व ९०,२५० एवढे होते. या तक्रारींचे सरासरी वार्षिक प्रमाण हे ९५ हजार तर दरमहा सरासरी प्रमाण हे ८ हजारच्या जवळपास आहे. यामध्ये, पाणी, कचरा, ड्रेनेज, शौचालये याबाबतच्या तक्रारीत वाढ झाली आहे. असा निष्कर्ष प्रजा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने काढला आहे.

यासंदर्भातील माहिती प्रजा फाउंडेशनतर्फे प्रमुख अधिकारी योगेश मिश्रा व मिलिंद म्हस्के यांनी २०१२ ते २०२१ या दहा वर्षांच्या सर्वेक्षण अहवालाद्वारे दिली आहे. महापालिकेने या तक्रारींचे निवारण जलदगतीने अगदी युद्धपातळीवर करणे अपेक्षित आहे. मात्र २०१७ मध्ये या तक्रारीचे निवारण ४८ तासात होत असे तेवढाच वेळ २०२१ मध्येही नोंदविण्यात आलेला आहे, असे निरीक्षण प्रजा फाउंडेशनने नोंदवून आपला खेद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

मुंबईकरांना पाणी, ड्रेनेज, शौचालये, आरोग्य आदी सेवासुविधा पुरविणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाने सामान्य नागरिकांच्या आयुष्याशी निगडित मूलभूत नागरी सेवा, सुविधा देताना या सेवांचा दर्जा, त्यांचा लोकांवर होणार परिणाम आणि लोकांचा त्यावरील प्रतिसाद घेऊन सेवसुविधांमध्ये अधिकाधिक सुधारणा करणे महत्वाचे आहे, अशी सूचना प्रजा फाउंडेशनतर्फे पालिका प्रशासनाला करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांच्या तक्रारीबाबत खुले व्यासपीठ उपलब्ध करून नागरी तक्रारी, त्यांचे निवारण व त्या तक्रारींची सद्यस्थिती याबाबत माहिती पालिकेने वेळोवेळी उपलब्ध करायला हवीय, असेही प्रजा फाउंडेशनने आपल्या अहवालात सूचित केले आहे.

२०१२ ते २०२१ दरम्यान सर्वात जास्त तक्रारी या एल वार्ड कुर्ला येथे ७४,०७८ तक्रारी, के/ पश्चिम वार्ड अंधेरी (प.) येथे ७३,५६२ तक्रारी, तर के/पूर्व वार्ड अंधेरी ( पूर्व) येथे ६६,६६० तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. सर्वात जास्त समस्या ड्रेनेजबाबत असल्याने त्याचे प्रमाण १६ टक्के (१,५०,८३१) एवढे असून ड्रेनेजबाबत अंधेरी ( प.) वार्डात सर्वात जास्त १४,६८७ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. तर घनकचरा संदर्भात सर्वात जास्त प्रमाण १० टक्के (९६,३६०) एवढे असून के/ पश्चिम वार्डात सर्वाधिक ७,१९५ तक्रारी आल्या आहेत. तसेच, पाण्याच्या संदर्भात सर्वात जास्त समस्येचे प्रमाण १० टक्के ( ९२,८५८) एवढे असून एम/ पूर्व गोवंडी – मानखुर्द वार्डात ९,५४१ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. रस्त्यांबाबत २०१२ मध्ये तक्रारींचे प्रमाण ३२ टक्के होतते २०२१ मध्ये थेट ८ टक्केवर आले आहे.

- Advertisement -

नागरी सेवासुविधाबाबत तक्रारींची संख्या २०१९ मध्ये १,२८,१४५ एवढी होती तर २०२१ मध्ये या तक्रारीची संख्या ९०,२५० एवढी झाली. त्यामुळे एवढ्याच कालावधीत तक्रारी ३७,८९५ ने कमी झाली आहे. मात्र सदर तक्रारींचे प्रमाण तेवढ्या कालावधीत कमी होण्यास खरे कारण म्हणजे, तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणालीवरचा नागरिकांचा विश्वास कमी होत असल्याचे लक्षण आहे, असे योगेश मिश्रा यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Temperature Increased : उन्हाचा तडाका; नागपुरात ‘या’ वेळेत सिग्नल राहणार बंद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -