Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईतील नागरिकांच्या समस्यांसंदर्भातील तक्रारींमध्ये वाढ, अहवालातून स्पष्ट

मुंबईतील नागरिकांच्या समस्यांसंदर्भातील तक्रारींमध्ये वाढ, अहवालातून स्पष्ट

Subscribe

मुंबई : मुंबईत सन २०२० च्या तुलनेत २०२२ मध्ये कचऱ्याच्या प्रमाणात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील दहा वर्षात नागरिकांच्या वायू प्रदूषणाच्या तक्रारीत २३७ टक्क्यांनी, तर कचरा विल्हेवाटीच्या तक्रारींमध्ये १२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईतील बदलते हवामान, स्वच्छतेचा अभाव, पालिका प्रशासनाची अकार्यक्षमता, वायु प्रदूषण, उष्णतेच्या लाटा आणि पाण्याचे प्रदूषित स्त्रोत, अशा गंभीर समस्या मुंबईला भेडसावत आहेत. शहरातील डंपिंग ग्राऊंडवर रोज वाहतूक केल्या जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याचा आणि प्रदूषण रोखण्याचा पालिकेचा उद्देशही सफल झालेला नाही, असा निष्कर्ष प्रजा फाऊंडेशनच्या (Praja Foundation) अहवालातून मांडण्यात आला आहे.

प्रजा फाऊंडेशनने मंगळवारी (16 मे) मुंबईतील नागरी समस्येबाबत अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात घन कचरा व्यवस्थापन, प्रदूषण, मलनि:सारण व हवा आणि पाण्याच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधले आहे. मुंबई महापालिकेने, गृहनिर्माण सोसायट्यांनी कचऱ्याची विल्हेवाट सोसायटींमध्येच लावण्याचे बंधनकारक केले होते. त्यामुळे सन २०१८-२०१९ पर्यंतच्या कालावधीत मुंबईत रोज जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण 10 हजार मेट्रिक टनवरून थेट 6,500 मेट्रीक टन वर आले होते.
त्यामुळे मुंबईत दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले होते. मात्र त्यानंतर संबंधित यंत्रणा थंडावल्याने कचऱ्याच्या रोजच्या जमा होणाऱ्या प्रमाणातही वाढ झाली.

- Advertisement -

प्रजाच्या अहवालानुसार, सन 2020 मध्ये प्रतीदिन 6904 मेट्रिक टन, तर सन 2022 मध्ये रोज 7582 मेट्रिक टन कचरा वाहतूक करण्यात आला म्हणजे कचऱ्याऱ्या  प्रमाणात 10 टक्के एवढी वाढ झाली आहे. सन २०२२ मध्ये कचरा निर्माण करणाऱ्या 2825 गृहनिर्माण संस्थांपैकी 1401 म्हणजे 50 टक्के संस्थांनी कचरा निर्मितीच्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही. तसेच, मिठी नदीमध्ये विष्ठेद्वारे जीवाणूंमुळे होणारे प्रदूषण अतिशय जास्त असल्याचे सदर अहवालात नमूद करण्यात आले आहे. सन २०१८ ते २०२२ या मागील पाच वर्षात सरासरी वार्षिक हवा गुणवत्ता निर्देशांक 125 मध्ये नोंदवण्यात आला. महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनेची कार्यक्षमता सुधारणे, मलनि:सारण प्रक्रिया आणि हवेची उत्तम गुणवत्ता, अशा ठोस उपाययोजनांचा समावेश केला आहे. हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे प्रजाचे संस्थापक निताई मेहता यांनी म्हटले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -