घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईच्या रुग्णसंख्येत वाढ, कोरोनामुक्तांची संख्याही घटली

Mumbai Corona Update: मुंबईच्या रुग्णसंख्येत वाढ, कोरोनामुक्तांची संख्याही घटली

Subscribe

रोना रुग्ण वाढीचा दर हा ०.२३ टक्के

मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र आजची संख्या मुंबईच्या चिंतेत आणखी भर पाडत आहे. मुंबईत आज पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. मुंबईत आज १ हजार ४२५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण ५९ जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आज केवळ १ हजार ४६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रोज रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या ही ४ हजारांच्या वर असते. आज हा आकडा फारच खाली कोसळला आहे .


मंबईत आज एकूण २९ हजार ३९१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १ हजार ४२५ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. मुंबईत सध्या २९ हजार ५२५ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ६९ लाख ३ हजार ६६४ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १४ हजार ४६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत १३ मे ते १९ मे पर्यंतचा विचार केला असता कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.२३ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या २७६ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. तर ७३ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत.

- Advertisement -

मुंबईत राज्यापेक्षा किमान बरी परिस्थिती पहायला मिळत आहे. राज्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. आज राज्यात २९ हजार ९११ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ४७ हजार ३७१ रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. राज्याच सध्या ५४ लाख ९७ हजार ४४८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


हेही वाचा – घरीच Covid-19 चाचणीसाठी आणखी टेस्टिंग किटला आठवड्याभरात मंजूर मिळण्याची शक्यता- ICMR

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -