घरमुंबईभातसा, तानसा, वैतरणा जलाशयांच्या सुरक्षेत वाढ

भातसा, तानसा, वैतरणा जलाशयांच्या सुरक्षेत वाढ

Subscribe

भारत आणि पाकिस्तान सीमारेषेवरील तणावपूर्ण वातावरणामुळे देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच धर्तीवर मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या ठाणे जिल्ह्यातील धरणे व जलवाहिन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा या तीनही धरणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी गुरुवारी तातडीने या तीन्ही धरणाच्या सुरक्षेची पाहणी केली. येथील सुरक्षेव्यवस्थेचा आढावा घेतला, तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी खबरदारी म्हणून सर्तक रहावे. धरणावर चोख असा बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी दैनिक आपलं महानगरला माहिती देताना सांगितले.

- Advertisement -

शहापूर तालुक्यातील भातसा धरण राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या अधिकार क्षेत्रात असल्याने भातसा धरणाच्या सुरक्षेसाठी जलसंपदाने सुरक्षा रक्षक महामंडळाचे एकूण 21 सुरक्षा रक्षक व 8पोलीस तैनात केले आहेत. असे भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी सांगितले, तर तालुक्यातील तानसा, वैतरणा ही जलाशये मुंबई महापालिकेच्या ताब्यात असल्याने या जलाशयांची सुरक्षा मुंबई महापालिकेचे सुरक्षा रक्षक सांभाळतात. तानसा धरणाच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिकेचे 34 सुरक्षा रक्षक तर वैतरणा धरणावर 31 सुरक्षा रक्षक येथे रात्रंदिवस पहारा देतात. धरण, सुरक्षा चौक्यांवर हे सुरक्षा रक्षक बंदोबस्तासाठी येथे नेमले आहेत.

तानसाची अघई चौकी व मोहीली येथे देखील सुरक्षा रक्षक नेमले आहेत. यातील काही सुरक्षा रक्षक आणि पोलीस जलवाहिन्यांचा बंदोबस्त सांभाळतात. या सुरक्षेबरोबरच ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातून या तीन धरणांकरिता सुरक्षेसाठी यापूर्वी प्रत्येकी 4 पोलीस कर्मचारी धरण माथ्यावर तैनात होते. यात वाढ करण्यात आली. आता प्रत्येक धरण माथ्यावर 8 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याचे शहापूर पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -