Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ, ७ तलावांत ४८ दिवसांचा पाणी साठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ, ७ तलावांत ४८ दिवसांचा पाणी साठा

आतापर्यन्त तुळशी तलावांत ७३६ मिमी, विहार तलावांत ६३२ मिमी पाऊस

Related Story

- Advertisement -

मुंबईत गेल्या २ ते ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी राज्यासह मुंबईतही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांत अतिवृष्टीमुळे पाणी साचले होते. तसेच पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठ्या करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. परंतु तरीही मुंबईला ४८ दिवसांचा पाणीपुरवठा होऊ शकेल एवढाच पाण्याचासाठा ७ तलावांमध्ये उरला आहे. मुंबईतील पवई तलावही मुसळधार पावसामुळे जून महिन्यातच भरुन वाहू लागला आहे. आगामी दिवसांत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो.

सध्या मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतही चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे तलावातील पाणी साठ्यात काहीशी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सात तलावांपैकी मुंबई उपनगरातील तुळशी तलावात सर्वाधिक ७३६ मिमी आणि विहार तलावांत ६३२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, १२ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत अप्पर वैतरणा तलावांत २८.०० मिमी इतका तर आतापर्यंत १६६.०० मिमी इतका, मोडकसागर तलावात ५०.०० मिमी इतका तर आतापर्यंत २६१.०० मिमी इतका, तानसा तलावांत ७७.०० मिमी इतका तर आतापर्यंत २२४.०० मिमी इतका, मध्य वैतरणा तलावांत ६१.०० मिमी तर आतापर्यंत १५१.०० मिमी इतका, भातसा तलावांत – ३२.०० मिमी तर आतापर्यंत १२४.०० मिमी इतका, विहार तलावात १२५.०० मिमी तर आतापर्यंत ६३२.०० मिमी इतका आणि तुळशी तलावात २०७.०० मिमी तर आतापर्यंत ७३६.०० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
त्यामुळे सात तलावातील पाणी साठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

तलावांत ४८ दिवसांचा पाणीसाठा

- Advertisement -

सध्या सात तलावात मिळून एकूण १ लाख ८५ हजार ९७१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार सध्याचा पाणीसाठा हा मुंबईला पुढील ४८ दिवस म्हणजे २९ जुलैपर्यंत पुरेल इतका आहे.

तलाव पाणीसाठा आतापर्यंत
दशलक्ष लि. पाऊस

अप्पर नोंद नाही १६६ मिमी
वैतरणा

- Advertisement -

मोडकसागर ४३,३९३ २६१ मिमी

तानसा १८,८२७ २२४ मिमी

मध्य वैतरणा २३,६७६ २५१ मिमी

भातसा ८१,६८४ १२४ मिमी

विहार १४,१७३ ६३२ मिमी

तुळशी ४२१७ ७३६ मिमी

एकूण १,८५,९७१ पाणीसाठा

- Advertisement -