तलावांत एका दिवसात २५ दिवसांच्या पाणीसाठ्याची वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या २४ तासांत चांगला मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तलावांत एका दिवसात तब्बल ९७,६०७ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची म्हणजेच २५ दिवसांच्या पाणी साठ्याची वाढ झाली आहे.

Water Resources That Supply Water To Mumbai

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या २४ तासांत चांगला मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तलावांत एका दिवसात तब्बल ९७,६०७ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची म्हणजेच २५ दिवसांच्या पाणी साठ्याची वाढ झाली आहे. मुंबईकरांसाठी ही खूपच आनंददायी बाब आहे. (Increase in water supply in lakes for 25 days in a day)

मुंबईत मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने पाणीसाठयात वाढ होत आहे. त्यामुळेच पालिकेने २७ जूनपासून मुंबईत लागू असलेली १० टक्के पाणीकपात ८ जुलैपासून रद्द केली असून पूर्वीप्रमाणे दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा सुरू केला आहे.

सध्या सात तलावांत मिळून एकूण ५ लाख १५ हजार ७३६ दशलक्ष लिटर पाणी साठा जमा असून गणित केल्यास हा पाणीसाठा पुढील १३३ दिवस म्हणजेच पुढील १९ नोव्हेंबरपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील संभाव्य मुंबईत ‘रेड अलर्ट’ असताना अत्यंत कमी पाऊस पडत आहे. तर याउलट मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळेच तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

९ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सात तलावांत एकूण ४,१८,१२९ दशलक्ष लिटर (२८.८९ टक्के) इतका पाणीसाठा जमा होता. जो दररोज होत असलेल्या ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्यानुसार पुढील १०८ दिवस पुरेल इतका म्हणजेच २४ ऑक्टोबरपर्यन्त पुरेल इतका होता. मात्र २४ तासांत तलावांत खूप चांगला पाऊस पडल्याने एकाच दिवसांत तलावांतील पाणीसाठ्यात तब्बल ९७,६०७ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची म्हणजेच तब्बल २५ दिवसांच्या पाणीसाठ्याची वाढ एका दिवसांत झाली आहे.

त्यामुळे सध्या तलावांत तब्बल ५,१५,७३६ दशलक्ष लिटर (३५.६३ टक्के ) पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील १३३ दिवस पुरेल इतका म्हणजेच पुढील १९ नोव्हेंबरपर्यंत पुरेल इतका आहे. अद्यापही पावसाळ्याचा अडीच महिना तरी शिल्लक आहे. या कालावधीत आणखीन चांगला पाऊस पडण्याची व त्यामुळे तलावांतील पाणीसाठ्यात आणखीन चांगली वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सात तलावांतील तुलनात्मक जमा पाणीसाठा

तलाव                   पाणीसाठा दशलक्ष लि.             पाणीसाठा दशलक्ष लि.

९ जुलै                                १० जुलै

अप्पर वैतरणा             २,४३३                               ३२,८८२

मोडकसागर               ७५,३९८                             ८४,५७६

तानसा                     ५७,०८७                             ६३,०६८

मध्य वैतरणा               ४२,७६२                             ५६,८१३

भातसा                     २,२३,१२१                            २,६०,६७५

विहार                      १२,३०८                               १२,६०७

तुळशी                     ५,०१८                                 ५,११४

एकूण                 ४,१८,१२९ (२८.८९ टक्के)          ५,१५,७३६ (३५.३६ टक्के)


हेही वाचा – महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणाला मुसळधार पावसाचा फटका; १२८ गावांचा संपर्क तुटला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा