घरCORONA UPDATECorona: धारावीत क्वारंटाईन कक्ष, बेड्सची संख्या वाढवा; केंद्रीय पथकाची सूचना

Corona: धारावीत क्वारंटाईन कक्ष, बेड्सची संख्या वाढवा; केंद्रीय पथकाची सूचना

Subscribe

मुंबईत वरळी, धारावी, कुर्ला, वडाळा, अंधेरी पश्चिम, ग्रँट रोड, वांद्रे, गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, चेंबूर, मालाड आदी भाग कोरोनाचे प्रमुख अड्डे बनले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाचा धोका अधिकाधिक वाढू लागला असून या महामारीबाबत केंद्रीय आरोग्य विभागाचे पथकाच्या पथकाने वरळीतील जिजामाता नगर पाठोपाठा बुधवारी धारावीतील परिस्थितीचा आढावा घेतला. धारावीचा परिसर हा झोपडपट्टीचा असल्याने अधिक रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता या विभागात अधिकाधिक अलगीकरण कक्ष अर्थात क्वारंटाईन कक्ष तयार करण्याचे निर्देश या केंद्रीय पथकाने महापालिकेला दिल्याचे म्हटले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह केंद्रीय आरोग्य पथकाने धारावीतील राजीव गांधी स्पोर्टस क्लब, साई हॉस्पिटलसह क्वारंटाईन कक्षाची पाहणी केली. यावेळी क्वारंटाईन कक्षातील रुग्णांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुविधांसह केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. तसेच कोरोनाग्रस्त आढळून आलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचीही माहिती घेतली. तसेच बाधित क्षेत्रातील लोकांना जेवणाची पाकिटे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपांचीही माहिती घेत नागरिकांची कुठेही गैरसोय किंवा त्यांना कमी पडू देवू नका, अशा सूचना केल्याची माहिती जी-उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष वसंत नकाशे यांनी दिली आहे.

- Advertisement -

धारावीचा संपूर्ण परिसर हा झोपडपट्टीचा असून सार्वजनिक शौचालयांचा वापर ते करत असतात. इमारतींमध्ये प्रत्येक घरांमध्ये शौचालय असले तरी झोपडपट्टीमध्ये सार्वजनिक शौचालयाचा वापर सर्व रहिवाशी करतात. त्यामुळे ज्या विभागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येईल, तेथील सार्वजनिक शौचालयांचा वापर करणाऱ्या सर्वांना क्वारंटाईनमध्ये स्थलांतरीत करण्यात यावे, अशाही सूचना केल्या आहेत.

विशेष म्हणजे, सध्या राजीव गांधी स्पोर्टस कॉम्प्लेक्ससह साई हॉस्पिटलसह अन्य ठिकाणी क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली असली तरी अधिक बेडची संख्या वाढवून क्वारंटाईन कक्ष अधिक प्रमाणात तयार करण्याचेही निर्देश या केंद्रीय पथकाने दिल्याची माहिती नकाशे यांनी दिली. धारावीत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचे विशेष लक्ष असून त्यांच्यासह सर्व नगरसेवक हे जी-उत्तर विभागातील सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. त्यामुळे येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही नकाशे यांनी स्पष्ट करत नागरिकही महापालिकेला सहकार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

धारावीत आतापर्यंत खासगी डॉक्टरांची दहा आणि महापालिकेची पाच अशा प्रकारची डॉक्टरची पथके सक्रीय आहेत. याशिवाय तात्पुरते डॉक्टर्स, नर्स आणि वॉर्डबॉयही उपलब्ध झाल्याने तेही धारावीतील कोरोनाग्रस्तांच्या सेवेत सक्रीय झाले आहे. २० डॉक्टर्स, २५ अभियंते, ५० नर्सेस, १७० आरोग्य सेविका आणि इतर ४० कर्मचारी तसेच २ हजार १५० कामगार अशाप्रकारे एकूण २ हजार ४८४ असा एकूण कर्मचारीवर्ग धारावीतील कोरोनाग्रस्तांच्या सेवेत आहे.

हेही वाचा –

Coronavirus Impact: सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलच्या वेतनाबाबत महत्त्वाची बातमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -