चौपाट्यांवरील सुरक्षेत वाढ, लाइफ गार्डच्या सोबतीला आणखी ४० जवान तैनात

मुंबईच्या चौपाट्यांवरची सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना विशेष ट्रेनिंग देऊन तैनात करण्यात येईल. या शिवाय रेड आणि ऑरेंज अलर्ट असणाऱ्या दिवशी धोक्याचा इशारा देणारे झेंडे आणि फलक सुद्धा लावण्यात येणार आहेत.

पावसाळा(monsson) सुरु झाला की मुंबईतील अनेक ठिकाणी फिरण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडतात. अशातच मुंबईतील चौपाट्यांवर सुद्धा मुंबईकर आवर्जून हजेरी लावतात. अशातच मुंबईकर- पर्यटक गर्दी करणाऱ्या मुंबईतील सातही चौपाट्यांची सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी ९४ लाईफ गार्डच्या जोडीला अग्निशमन दलाचे आणखी ४० जावं तैनात करण्यात येणार आहेत. सद्य स्थितीत खासगी संस्थेच्या माध्यमातून नेमलेले लाईफ गार्ड तीन शिफ्ट मध्ये मुंबईच्या चौपाट्यांवर तैनात आहेत. या जवानांसोबतच आणखी चार ते पाच जवान नेमण्यात येणार आहेत अशी माहिती अग्निशमन दलाचे(fire brigade) प्रमुख अधिकारी हेमंत परब यांनी दिली.

हे ही वाचा – राज्याच्या ‘या’ भागांत रेड अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पावसाळा सुरु झाला की मुंबईच्या चौपाट्यांवर मुंबईकर – पर्यटकांची विशेष गर्दी होते. अशातच पर्यटकांच्या बेजबाबदार वागण्याने जीवितहानी होण्याचा सुद्धा धोका असतो. यावर्षी चौपाट्यांवर जून महिन्यापासून आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनेत ७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने रेड आणि ऑरेंज अलर्ट असलेल्या दिवशी सकाळी १० नंतर चौपाट्यांवर नागरिकांना आणि पर्यटकांना फिसरण्यास बंदी घातली आहे. या भागातील म्हणजेच चौपाट्यांवरील सुरक्षेसाठी पोलीस खात्यानेही सहकार्य करण्याचे आश्वासन मुंबई पालिका प्रशासनाला आश्वासन दिले आहे.

हे ही वाचा – मुसळधार पावसामुळे मुंबईसाठी पुढील २ दिवस सतर्कतेचा इशारा

मुंबईच्या चौपाट्यांवरची सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना विशेष ट्रेनिंग देऊन तैनात करण्यात येईल. या शिवाय रेड आणि ऑरेंज अलर्ट असणाऱ्या दिवशी धोक्याचा इशारा देणारे झेंडे आणि फलक सुद्धा लावण्यात येणार आहेत. शिवाय पर्यटकांनाही सतर्कतेने आ णि जबाबदारीने वागण्याचे आवाहन करण्यात येत आहे असे अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी संगितले.

हे ही वाचा – भाजपचे ‘मिशन १३४’चे टार्गेट ; शिवसेनेच्या जागा रडारवर

हे ही वाचा –  मुंबई महापालिकेकडून तरुण उद्योजकांद्वारे निर्मित वस्तू आणि उपकरणांना प्रोत्साहन

नेमकी सज्जता कशी आहे

समुद्राला भारती असताना पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे दुर्घटना उघडण्याची शक्यता असते. त्याचबरोबर चौपाट्यांवर पर्यटकांनी खोल पाण्यात जाऊ नये यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने चौपाट्यांवर जनजागृती करणारी मोहीम सुद्धा राबविण्यात येते. त्याचबरोबर चौपाट्यांवर जे लाईफ गार्ड तैनात करण्यात आले आहेत त्यांच्या कडे बचाव कार्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची साधने उपलबध करण्यात आली आहेत.

हे ही वाचा – द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

लाईफ गार्डना जेटकिज, सहा रेस्क्यू बोट आणि हसा सर्व्ह बोट सह बचाव कार्यासाठी लागणारी इत्तर साधने सुद्धा देण्यात आली आहेत. त्याचबरापाबर लाईफ गार्डला बॅकअप देण्यासाठी फायर ब्रिगेडच्या प्लस रिस्पॉन्स टीम सुद्धा तैनात करण्यात अली आहेत . वांद्रे, कुर्ला, मालाड, गोराई आणि दहिसर फायर स्टेशन वर तैनात आहेत. त्याच सोबत पर्यटकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे.

हे ही वाचा – सदा सरवणकर यांचा शिवसेना विभागप्रमुखपदाचा राजीनामा; तीन शाखाप्रमुखांनीही सोडले पद