घरताज्या घडामोडीCorona in India: एका दिवसात ४ लाखांहून अधिक नव्या बाधितांची नोंद; ४,०९२...

Corona in India: एका दिवसात ४ लाखांहून अधिक नव्या बाधितांची नोंद; ४,०९२ जणांचा बळी

Subscribe

देशभरात सध्या कोरोनाचा उद्रेक सुरू असून दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहे. गेल्या २४ तासात पुन्हा एकदा कोरोनाच्या चार लाखांहून अधिक नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. तर तब्बल ४ हजार ९२ कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. या आकडेवारीवरून असे समोर आले की, एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा हा विक्रम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ४ लाख ३ हजार ७३८ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा वाढून तो २ कोटी २२ लाख ९६ हजरांवर पोहोचला आहे तर आतापर्यंत एकूण २ लाख ४२ हजार ३६२ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.

- Advertisement -

देशात कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू असताना देशात सध्या ३७ लाख ३६ हजार ६४८ इतके सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे. या काळात दिलासादायक बाब म्हणजे १ कोटी ८३ लाख १७ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे. यासह देशभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू असताना आतापर्यंत १६ कोटी ९४ लाख ३९ हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तर राज्यात मागील २४ तासांत राज्यात ५३ हजार ६०५ नवे कोरोनाबाधित आढळले असून ८६४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० लाख ५३ हजार ३३६ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७५ हजार २७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी दिवसभरात ८२ हजार २६६ रुग्ण बरे होऊन घरी असून आजपर्यंत एकूण ४३ लाख ४७ हजार ५९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मुंबईत कोरोनाबाधितांची रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांच्या नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २ हजार ६७८ नवे कोरोनाबाधित आढळले असून ६२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ हजार ६०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -