घरमुंबई'चांद्रयान-२' : चंद्रावर पाणी शोधणारा भारत ठरु शकतो पहिला देश

‘चांद्रयान-२’ : चंद्रावर पाणी शोधणारा भारत ठरु शकतो पहिला देश

Subscribe

चंद्रावर खरच पाणी आहे का? याचे लवकरच उत्तर आता भारताला मिळणार आहे.

‘चांद्रयाण-२’ हा भारताच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. इस्त्रोने या प्रकल्पसाठी तयार केलेले यान आता अवकाशात झेप घेणार आहे. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे यान अवकाशाकडे रवाना होणार आहे. हे यान पृथ्वीच्या तिन्ही कक्षा पार करुन अवकाशात जाईल त्यानंतर चंद्राच्या कक्षात प्रवेश करेल. याअगोदर अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर पाय ठेवले आहे. भारताने देखील याअगोदर चंद्रावर एक यान पाठवले होते. त्या यानमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारावर चंद्रावर बर्फ असण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे या भागात खरच बर्फ आहे का? याची खरीखुरी माहिती आता मिळणार आहे.

चंद्राच्या दक्षिण भागातच का जाणार यान?

याअगोदर इस्त्रोने चंद्राच्या दक्षिण भागातच एक यान पाठवले होते. ते यान तिथे लॅण्ड झाले नव्हते. मात्र त्या यानकडून मिळालेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर चंद्रावर बर्फ असल्याची शक्यता वर्तवली जात होती. याशिवाय अमेरिका, रशिया आणि चीन यांनी देखील चंद्रावर यान पाठवले आहे. मात्र, ते चंद्राच्या दक्षिण भागात संशोधनासाठी कधी गेलेले नाहीत. या भागात संशोधन करणारा भारत हा पहिला देश आहे. त्याशिवाय दक्षिण भागात सावली असते. तिथे सुर्याचा पाहिजे तसा प्रकाश पोहचू शकत नाही. त्यामुळे तो भाग थंड असल्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. आता या भागात खरच नेमकी काय परिस्थिती आहे? याची तंतोतंत माहिती ‘चांद्रयान-२’ मोहिमेच्या माध्यमातून मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – इस्रोच्या मोहिमेचं काऊंटडाऊन सुरु; ‘चांद्रयान-२’ प्रक्षेपणासाठी सज्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -