घरमुंबईमांगता है भारत, १० हजारांचे बजेट स्मार्टफोन

मांगता है भारत, १० हजारांचे बजेट स्मार्टफोन

Subscribe

कोरोनाच्या काळात परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोन्सना भारतीय ग्राहकांकडून अधिक मागणी असल्याचे समोर आले आहे. बहुतांश लोक सध्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवत असून प्रत्येकाच्या मनोरंजन, व्यावसायिक आणि शैक्षणिक गरजा वेगवेगळ्या असल्याने एकाच घरात एकाच प्रकारच्या अनेक उपकरणांची आवश्यकता भासू लागली आहे. यामुळे, अनेक लोक बजेटबाबत जागरुक झाले आहेत. विशेषत: स्मार्टफोन घेताना तो महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे, कोविडपूर्व काळाच्या तुलनेत जूनपासून फ्लिपकार्टवर १०००० रुपयांखालील उत्पादनांचा शोध घेतला जाण्याचे प्रमाण ६० टक्क्यांनी वाढले आहे. ५१ दशलक्षांहून अधिक फ्लिपकार्ट वापरकर्त्यांनी १० हजार रुपयांखालील बजेट स्मार्टफोनमध्ये रस दाखवला आहे.

बॅटरी क्षमता आणि डिस्प्लेचा आकार याबाबतीत ५००० mAh आणि ६.२२ इंची स्क्रीन हे मापदंड ठरले आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यात या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. अनेक ब्रँड्सनी या किमतीत ६००० mAh बॅटरी आणि ६.८२ इंची डिस्प्ले असलेले फोन सादर केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून स्मार्टफोनच्या वापराच्या स्वरुपात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. आता फोनवर एकाच वेळी अनेक कामे केली जाणे, ही काळाची गरज ठरत आहे. लोक स्मार्टफोनवर बराच वेळ घालवतात आणि त्यामुळे आता बॅटरीच्या कालावधीबाबत तडजोड करता येण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. फ्लिपकार्टवर बॅटरीशी संबंधित बाबींचा शोध घेण्याच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. मार्चपासून हा शोध जवळपास दुप्पट झाला आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या काळात परवडणाऱ्या दरातील फोनची मागणी वाढल्याने अनेक ब्रँड्सनी अनेक तास सहज चालतील असे नवे फोन आणले.  रीअलमीची सी सीरिज (सी२ आणि सी३), शाओमीची रेडमी ८ आणि ८ए आणि इन्फिनिक्सची हॉट सीरिज. शिवाय फ्लिपकार्टवर तीन नव्या कंपन्याही आल्या – गिओनी, आयटेल आणि टेक्नो. या ब्रँड्सनी देशभरात ग्राहकांचा भक्कम पाया उभा केला आहे. मोठा डिस्प्ले, मोठी स्क्रीन असलेल्या स्मार्टफोन्सच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी रीअलमीने त्यांच्या लोकप्रिय सी सीरिजमध्ये (रीअलमी सी११, सी१२ आणि सी१५) तीन नवे फोन सादर केले. या तीन फोनमधील मुख्य विश्वासार्ह घटक (आरटीबी) म्हणजे त्यातील बॅटरी (६००० mAH पर्यंत) आणि डिस्प्ले (६.५३ इंचीपर्यंत).

इन्फिनिक्सने आपली अत्यंत लोकप्रिय हॉट सीरिज आता इन्फिनिक्स हॉट ९ आणि हॉट ९ प्रो अशी विस्तारली आहे. या दोन्ही फोनमध्ये ५००० mAHची बॅटरी आणि ६.६ इंची डिस्प्ले आहे. त्यांनी इन्फिनिक्स स्मार्ट ४ प्लस हा अत्यंत परवडणाऱ्या दरातील फोन आणला आहे. प्रामुख्याने घरातून शिकण्यासाठी वापर यावर या फोनचा भर आहे. या ब्रँडने उत्पादनाचे प्रमोशन करण्यासाठी या विषयावर एक फिल्मही बनवली आहे. या फोनमध्ये ६.८ इंची स्क्रीन आणि ६००० mAHची बॅटरी आहे. ६००० mAH बॅटरी असणारा हा सर्वात परवडणाऱ्या किमतीतील फोन आहे. जिओनीने जिओनी मॅक्स या स्मार्टफोनद्वारे भारतीय बाजारपेठेत पुन्हा प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे आयटेल व्हिजन १ ३ जीबी, टेक्नो स्पार्क पॉवर २ आणि टेक्नो स्पार्क पॉवर गो २०२० या इतर फोन्सनाही चांगली मागणी आहे.

- Advertisement -

कोणत्या शहरातून मागणी

परवडणाऱ्या दरातील डेटा प्लॅन्समुळे तृतीय श्रेणी आणि त्याखालच्या इतर शहरांमधील स्मार्टफोनची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोनची गरज वाढली आहे. परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोनच्या मागणीत सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेशचा आहे. त्यानंतर बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक आहे. एकूण मागणीतील ७० टक्के वाटा द्वितीय श्रेणी आणि त्याखालील शहरांचा आहे. गोरखपूर, रायपूर, सिवान, देवरिया, हिसार, मदिनीपूर आणि आझमगढ अशी शहरेही यात आहेत.


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -