घरमुंबईCorona Vaccine : कोरोना लस मोफत द्या; आयएमएची सरकारला विनंती

Corona Vaccine : कोरोना लस मोफत द्या; आयएमएची सरकारला विनंती

Subscribe

कोरोनाविरोधात परिणामकारक लस उपलब्ध झाल्यामुळे ही साथ आटोक्यात आणणे शक्य होणार आहे.

अधिकाधिक नागरिकांना कोरोना लस मिळावी यासाठी केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली. मात्र, खासगी रुग्णालयामध्ये लशीसाठी २५० रुपये मोजावे लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर, कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांमध्ये समूह प्रतिकारशक्ती जलदगतीने तयार होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नागरिकांना मोफत लस देण्यात यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (आयएमए) सरकारला करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लसीकरण मोहिमेचे संकेतस्थळ cowin.gov.in हे वापरायला सुलभ करावे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याचा वापर करून लस टोचून घेतील, अशी सूचनाही आयएमएकडून करण्यात आली आहे.

आधुनिक वैद्यक शास्त्रातील महत्वाचे संशोधन

लसीकरण हे आधुनिक वैद्यक शास्त्रातील महत्वाचे संशोधन आहे. लसीच्या वापरातून देवी आणि पोलिओसारख्या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यात भारताला यश आले. अनेक आजारांचे प्रमाण, त्यांची तीव्रता आणि त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्यातही भारत यशस्वी झाला. कोरोनाविरोधात परिणामकारक आणि सुरक्षित लस उपलब्ध झाल्यामुळे ही साथ आटोक्यात आणणे शक्य होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही लस सर्व नागरिकांना मोफत द्यावी. जेणेकरून नागरिकांमध्ये समूह प्रतिकारशक्ती लवकर तयार होईल आणि या संकटातून आपण यशस्वीरित्या बाहेर पडू, असे आवाहन आयएमएकडून सरकारला करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -