घरताज्या घडामोडीIndian Railway : धुक्यामुळे ग्वाल्हेर ते बिहार, उज्जैनला जाणाऱ्या ट्रेन रद्द

Indian Railway : धुक्यामुळे ग्वाल्हेर ते बिहार, उज्जैनला जाणाऱ्या ट्रेन रद्द

Subscribe

रेल्वे प्रशासनाने उत्तर भारतात धुक्याचा प्रभाव सुरु होताच ग्वाल्हेरसह उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. त्याच वेळी, काही गाड्यांची वारंवारता कमी करण्यात आली आहे आणि काहींचे थांबे मर्यादित केले जात आहेत. उज्जयनी एक्स्प्रेस २४ फेब्रुवारीपर्यंत रद्द राहणार आहे. त्याचबरोबर बरौनी एक्स्प्रेस आठवड्यातून २ दिवस धावणार नाही. दिल्लीच्या निजामुद्दीन स्थानकातून झाशीला जाणारी ताज एक्सप्रेसही ग्वाल्हेरपर्यंत धावणार आहे. ही गाडी आजपासून झाशीला जाणार नाही. धुक्यामुळे गाड्यांना उशीर आणि प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. मात्र, हे टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता गाड्यांच्या संचलनात बदल केले आहेत.

ग्वाल्हेर बरौनी एक्स्प्रेस १ डिसेंबर ते १ मार्च या कालावधीत आठवड्यातून फक्त ५ दिवस धावणार आहे. नवी दिल्ली ते झाशी दरम्यान धावणारी ताज एक्सप्रेस १ डिसेंबरपासून निजामुद्दीन ते ग्वाल्हेरपर्यंत धावणार आहे.उज्जैन ते डेहराडून उज्जैन एक्स्प्रेस १ डिसेंबर ते २४ फेब्रुवारी या कालावधीत रद्द करण्यात आली आहे.

- Advertisement -

ग्वाल्हेर-बरौनी एक्स्प्रेस ‘या’ तारखांना धावणार नाही.

  • डिसेंबर – २,६,९,१३,१६,२०,२३,२७,३० या तारखांना रद्द केली जाईल.
  • जानेवारी – ३,६,१०,१३,१७,२०,२४, आणि ३१ या तारखांना रद्द केली जाईल.
  • फेब्रुवारी –  ३,७,१०,१४,१७,२१,२४,२८ या तारखांना रद्द केली जाईल.

‘या’ तारखांना बरौनी-ग्वाल्हेर एक्स्प्रेस धावणार नाही

  • डिसेंबर –  ३,७,१०,१४,१७,२१,२४,२८,३१ या तारखांना रद्द केली जाईल.
  • जानेवारी –  ४,७,११,१४,१८,२५ आणि २८ या तारखांना रद्द केली जाईल.
  • फेब्रुवारी – १,४,८,११,१५,१८,२२,२५ या तारखांना रद्द केली जाईल.
  • मार्च – १ मार्चला रद्द करणार

हे ही वाचा :  काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपविरोधात लढा भविष्यात नेटाने लढला जाईल, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -