घरमुंबईइंडियन स्टार कासवाची विक्री करणारा गजाआड

इंडियन स्टार कासवाची विक्री करणारा गजाआड

Subscribe

वनविभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाण्यातील बालाजी अक्वेरीयम या मासे आणि पक्षी विक्री करणार्‍या दुकानात इंडियन स्टार टॉरटाईज या प्रजातीच्या दुर्मिळ कासवाची होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनक्षेत्रपाल ठाणे यांच्या पथकाने छापेमारी करीत चार दुर्मिळ जिवंत कासव हस्तगत केली. या प्रकरणी शिवा मुतुरामलिंगम नाडार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे.

ठाणे वनविभाग क्षेत्रपालांना मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाच्या पथकाने ठाण्यातील बालाजी अक्वेरीयम शॉप नं 6, वसंत विहार जिल्हा ठाणे या दुकानात छापेमारी करीत तपासणी केली. असता दुकान मालक शिवा मुतुरामलिंगम नाडार (32) रा. मानपाडा पोलीस ठाण्याजवळ, रुम नं 502 मी बिल्डिंग नं 1 मानपाडा याने काउंटरच्या खाली प्लास्टिक बादलीत चार दुर्मिळ जिवंत कासव विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले.

- Advertisement -

वनविभागाने चार कासवे जप्त करून नाडार याला अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. या छापामारीत उपवनसंरक्षण जितेंद्र रामगावकर, सहाय्यक वनरक्षक आणि गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनपाल पवार, परदेशी, आणि ठाणे राउंड स्टाफ आदींनी सहभाग घेतला. अधिक तपास वनपाल ठाणे नरेंद्र मुठे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -