नवी दिल्ली : भारतीय पुरुष संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. या दोघांमध्ये येत्या 22 नोव्हेंबर मालिकेला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियासोबत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यासाठी आता भारतीय नियमाक मंडळाने (BCCI) 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मात्र संघाची घोषणा करताना सलामीवर शेफाली वर्माला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. (Indian women team announced for ODI series against Australia under Harmanpreet Kaur leadership)
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधली एकदिवसीय मालिका पुढील महिन्यात 5 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका आयसीसी महिला चॅम्पियनशिप अंतर्गत आयोजित केली जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर मैदानावर खेळवण्यात येतील. दुसरा 8 सामना डिसेंबरला पार पडल्यानंतर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 11 डिसेंबरला पर्थमधील WACA मैदानावर खेळवला जाईल.
बीसीसीआयने अनुभवी हरमनप्रीत कौर पुन्हा एकाद संघाचे नेतृत्व करताना दिसेल तर स्मृती मंधानाच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सलामीवीर शेफाली वर्माला संघातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने तिला संघाबाहेर काढण्याचे कारण सांगितले नसले तरी खराब फॉर्ममुळे तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे प्रदीर्घ काळानंतर हरलीन देओलला राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे.
A look at #TeamIndia‘s ODI squad for the upcoming tour of Australia 👌👌#AUSvIND pic.twitter.com/q0LRy53sSD
— BCCI Women (@BCCIWomen) November 19, 2024
शेफालीची निराशाजनक कामगिरी
आतापर्यंत शेफाली वर्माने 29 एकदिवसीय सामन्यांच्या 29 डावात 644 धावा केल्या आहेत. या कालावधीत तिने 4 अर्धशतके झळकावली आहेत, मात्र अद्याप तिला शतक झळकावता आलेले नाही. मात्र तिच्या कारकिर्दीतील मागील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर शेफालीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. ती गेल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 12, 11 आणि 33 धावांवर बाद झाली आहे. खराब फॉर्ममुळे तिला ऑस्ट्रेलिया मालिकेतून वगळण्यात आल्याची चर्चा आत होत आहे.
भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, प्रिया पुनिया, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तेजल हसबनीस, तीतस साधू, अरुंधती रेड्डी, सायमा ठाकूर, रेणुका सिंह ठाकूर.