Eco friendly bappa Competition
घर क्रीडा अजित वाडेकर अनंतात विलीन

अजित वाडेकर अनंतात विलीन

Subscribe

भारताचे दिवंगत माजी खेळाडू आणि कर्णधार अजित वाडेकरांवर आज चैत्यभूमीवर शासकीय इतमामात अत्यंसस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवारसह राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती.

अजित वाडेकर भारतीय क्रिकेटचे पहिले सुपरस्टार म्हटला तर अतिशयोक्ती होणार नाही. आपल्या अप्रतिम कर्णधारीच्या जोरावर भारताला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघासमोर १९७१ साली विजय मिळवून देणारे अजित वाडेकर आता आपल्यात राहीले नाहीयेत. १५ ऑगस्टला वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील जसलोक रूग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अत्यंयात्रा आज मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर नेण्यात आली आणि तिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी बऱ्याच माजी क्रिकेटर्स आणि राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती.

शिवाजी पार्कच वैभव हरपला – संदीप पाटील

भारताचे माजी खेळाडू संदीप पाटील यांनी अजित वाडेकराबद्दल बोलताना सांगितले की, “मी लहानपणापासून वाडेकर सराना बघतोय, आणि ते नेहमीच माझ्यासाठी सरच राहतील, तसेच त्यांच्या जाण्याने आज शिवाजी पार्कच वैभवच हरपला आहे. त्याचबरोबर जशी प्रेरणा १९८३ चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाने आजच्या खेळाडूना दिली तशी आम्हाला प्रेरणा ही अजित यांनी दिली.”


राजकीय नेतेही नतमस्तक

- Advertisement -

भारताचे दिवंगत माजी खेळाडू अजित वाडेकरांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. यावेळी शिवसेना पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी बोलताना सांगितले की, “अजित वाडेकर हे त्या काळचे खेळाडू आहेत जे वेस्ट इंडिजच्या भेदक बॉलर्सचा सामना हेल्मेट, थायपॅड, चेस्टपॅड असे काही नसताना करायचे, तसेच त्यांचे पॅव्हेलियनपासून ते क्रिझपर्यंतचे चालणे हे अतिशय डौलदार होते. त्यांचे असे आम्हाला सोडून जाणे मनाला चटका लावून गेले आहे.” त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी देखील आपले मन हलके करताना सांगितले की,”मी अगदी शाळेत असल्यापासून अजित यांचा चाहता होतो. त्यांच्या सामन्यांची कॉमेंट्री मी तेव्हा रेडिओवर एकायचो तसेच त्यांना मी कधीही आवजाव केलं नाही कारण ते एक खेळाडू होते आणि खेळाडू नेहमीच तरूण राहतो.”

arvind sawant and jitendra avhad
अरविंद सावंत आणि जितेंद्र आव्हाड

शासकीय इतमामात झाले अत्यंसस्कार

- Advertisement -

भारताचे माजी खेळाडू अजित वाडेकरांवर दादरच्या चैत्यभूमीवर शासकीय इतमामात अत्यंसस्कार करण्यात आले. त्यांना त्यांच्या घरून तिरंग्यात लपेटून त्यांची अत्यंयात्रा काढण्यात आली. विशेष म्हणजे त्यांची कर्मभूमी असलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याजवळही त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना चैत्यभूमीवर नेऊन त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसस्कार करण्यात आले.

अशाप्रकारे भारतीय क्रिकेटमध्ये सुवर्णकाळ आणणारे दिवंगत माजी क्रिकेटर अजित वाडेकरांना त्यांचे परिवार, चाहते आणि मित्रमंडळीनी साश्रू नयनांनी निरोप दिला.

- Advertisment -