घरठाणेकल्याणमधील मध्य रेल्वेच्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक लोको शेडला ९३ वर्षे पूर्ण

कल्याणमधील मध्य रेल्वेच्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक लोको शेडला ९३ वर्षे पूर्ण

Subscribe

कल्याणमधील इलेक्ट्रिक लोको शेड २८ नोव्हेंबर २०२१ रोजी ९३ वां स्थापना दिवस साजरा करीत आहे. भारतीय रेल्वेच्या या प्रमुख शेडला तत्कालीन ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे (GIPR)’ अंतर्गत पहिले इलेक्ट्रिक लोको शेड असण्याचा गौरव प्राप्त आहे. गेल्या ९३ वर्षांच्या प्रवासात शेडने १६ विविध प्रकारच्या लोकोमोटिव्हची देखभाल केली आहे. सुरुवातीला २१६० HP EA-1 आणि २२३० HP EF-1 प्रकारचे डीसी लोकोमोटिव्ह सोपवण्यात आले, त्यानंतर शेडला WCM-२, WCM-३ आणि WCM-४ वर्गाचे लोकोमोटिव्ह मिळाले जे मुंबई विभागात प्रचलित असलेल्या १५०० V DC कॅटेनरीमध्ये काम करण्यासाठी बदलले गेले.मुंबई विभाग हा ईशान्य आणि दक्षिण पूर्व अशा दोन्ही बाजूंनी घाट विभागांनी वेढलेला असल्याने, कल्याण बेस लोकोमोटिव्ह, घाटाच्या वर किंवा खाली असलेल्या मेल/माल गाड्यांना बँकिंग सेवा (अतिरिक्त शक्ती/उर्जा पुरवणे) प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

- Advertisement -

वर्ष २००७ नंतर, मुंबई विभागाचे डीसी ते एसी मध्ये कॅटेनरी रूपांतर करण्याची प्रक्रिया ईशान्य घाटात झाली आणि त्यामुळे WAG-7 आणि WAG-5 लोकोमोटिव्हची ओळख झाली. इलेक्ट्रिक लोको शेड/कल्याणच्या टीमची विविध प्रकारची लोकोमोटिव्ह एकाच वेळी हाताळण्याची क्षमता लक्षात घेऊन, वर्ष २०१३ मध्ये नवीनतम तंत्रज्ञान असलेले पूर्णतः एसी लोकोमोटिव्ह 6122 HP WAG-9 IGBT कनवर्टरसह त्यांच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले.

इलेक्ट्रिक लोको शेड, कल्याण यांच्या ताफ्यात अपघात निवारण ट्रेन (एआरटी) आणि हाय स्पीड – सेल्फ प्रोपेल्ड ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन (HS-SPART) आहे. कल्याण एआरटीच्या सुप्रशिक्षित ब्रेक-डाउन टीमला असामान्य काळात कार्यक्षमतेने काम केल्याने अनेकदा गौरविण्यात आले आहे. पुश पुल पद्धतीने पहिली राजधानी ट्रेन चालवण्यातही शेडने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सक्षम केलेल्या पुश पुल पद्धतीचे भारतीय रेल्वेत कौतुक करण्यात आले कारण त्यामुळे घाट विभागात मनुष्यबळ आणि बँकिंग लोकोमोटिव्हची गरज कमी झाली.

- Advertisement -

WAP-7 लोकोमोटिव्ह आणि HOG सिस्टीम जोडून डिझेल आधारित पॉवर कारचा कमीत कमी वापर करून पर्यावरण समृद्ध करण्यासाठी इलेक्ट्रिक लोको शेड, कल्याण मोठे प्रयत्न करीत आहे. कोविड -१९ दरम्यान विनाव्यत्यय मालवाहतूक आणि प्रवासी सेवा प्रदान करण्यासाठी शेड्यूल/अनशेड्यूल कामाच्या शेड क्रियाकलापांची देखरेख करण्यातही या शेडने चांगले काम केले आहे.


हे ही वाचा – omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नाही – ICMR


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -