घरक्राइमचार वेळा लग्न, पाचवी पास असूनही इंग्रजी-चिनी भाषा फाडफाड बोलतो; कोण आहे...

चार वेळा लग्न, पाचवी पास असूनही इंग्रजी-चिनी भाषा फाडफाड बोलतो; कोण आहे सरफराज मेमन?

Subscribe

चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेऊन आलेला संशयित दहशतवादी सरफराज मेमन याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळताच त्याला अटक करण्यात आली आहे.

चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेऊन आलेला संशयित दहशतवादी सरफराज मेमन याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळताच त्याला अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या अहवालात सर्फराजने पाकिस्तान आणि हाँगकाँगमधून प्रशिक्षण घेतले असून तो भारतात मोठ्या हल्ल्याची योजना आखत असल्याचं म्हटलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत झालेल्या चौकशीत सरफराजने पोलिसांना सांगितले आहे की, तो १२ वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहत आहे. एजन्सींना अद्याप त्याचे नाव कोणत्याही दहशतवादी संघटनेशी जोडलेले आढळले नाही. एजन्सी सध्या सरफराजची कडक चौकशी करण्यात व्यस्त आहे.

एनआयएने मुंबई पोलिसांना ई-मेल पाठवून मेमनबाबत सतर्क राहण्यास सांगितले होते. एजन्सीने त्याचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्टही पाठवले होते. मेमन भारतासाठी धोकादायक असल्याचेही एजन्सीने म्हटले आहे. सरफराज मेमन नक्की आहे कोण? जाणून घेऊया…

- Advertisement -

मुंबईत झाला जन्म
सरफराजने केवळ पाचवीपर्यंतच शिक्षण घेतल्याचं सांगितलं जातं. त्यांचा जन्म मुंबईत झाला, पण १९९५ मध्ये त्यांचे कुटुंब इंदूरला स्थलांतरित झाले. इंदूरमध्ये तो फातिमा, ग्रीन पार्क कॉलनी, चंदन नगर येथे राहतो. त्याचे वडील इथल्या बेकरीमध्ये काम करायचे. सरफराजचे मोबाईलचे दुकान देखील आहे, जिथे तो परदेशातून स्वस्त दरात मोबाईल विकत घेतो आणि तिथे वाढीव किमतीत विकतो. कधी तो कोलकात्यात तर कधी मुंबईत राहतो. आईच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. याचा राग सरफराज आणि त्याच्या दोन भावांना होता. हे सर्व भावंड वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. पोलिसांच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सरफराजने सांगितले की, त्याने हाँगकाँगमध्ये एका चिनी महिलेशी लग्न केले होते. तिच्याशी वाद झाल्यानंतर तो भारतात आला होता. इथे भारतातही त्यांनी चार वेळा लग्न केली आहेत. याबाबत सर्वांची विचारपूस केली जात आहे. लग्नानंतर तो कुठेतरी भाड्याच्या खोलीत राहू लागला होता, पण त्याची कागदपत्रे पोस्टाने त्याच्या फातमा अपार्टमेंटमधल्या घरच्या पत्त्त्यावर येत होती. ही कागदपत्र घ्यायला तो कधी कधी फेरी मारत असे. सरफराजचे शिक्षण केवळ पाचवीपर्यंतचे झाले आहे. पण तरीही तो हिंदी, इंग्रजी आणि चिनी भाषा फाडफाड बोलतो.

अनेक राज्ये निशाण्यावर
सरफराज मेमनच्या निशाण्यावर अनेक राज्ये होती. संबंधित राज्यांच्या पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, सरफराजला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मध्यप्रदेशात कायद्याचे राज्य आहे, येथे संशयास्पद कारवायांमध्ये गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जात नाही. पोलीस पूर्ण गांभीर्याने तपास करत असून तपासानंतर जे काही तथ्य समोर येईल त्या आधारे कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -