घरमुंबईशीना बोरा हत्याकांड : इंद्राणी मुखर्जी अखेर साडे सहा वर्षांनंतर तुरूंगाबाहेर

शीना बोरा हत्याकांड : इंद्राणी मुखर्जी अखेर साडे सहा वर्षांनंतर तुरूंगाबाहेर

Subscribe

मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी  2015 मध्ये इंद्राणी मुखर्जीला अटक केली होती. तेव्हापासून इंद्राणी  भायखळातील महिला मध्यवर्ती कारागृहात होती. जामीनासाठी इंद्राणीने अनेक वेळा सत्र न्यायालय तसेच हायकोर्टात अर्ज केला.

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी अखेर तब्बल साडे सहा वर्षांनंतर तुरूंगाबाहेर आली आहे. शुक्रवारी सायंकाळी ५.३५ वाजता इंद्राणी मुखर्जी भायखळा तुरूंगाच्या बाहेर आली. यावेळी प्रसारमाध्यमांनी तुरूंगाच्या बाहेर गर्दी केली होती. यावेळी इंद्राणीने तुरुंगाच्या प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे पाहून स्मितहास्य केले.

दोन लाखांच्या जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच किंमतीच्या हमीवर सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणीला जामीन मंजूर केला.  सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर गुरुवारी मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाने जामीनावर शिक्कामोर्तब केले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर इंद्राणी वकिलांसोबत आपल्या मर्सिडीज कारमधून घराकडे रवाना झाली.

- Advertisement -

मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी  2015 मध्ये इंद्राणी मुखर्जीला अटक केली होती. तेव्हापासून इंद्राणी  भायखळातील महिला मध्यवर्ती कारागृहात होती. जामीनासाठी इंद्राणीने अनेक वेळा सत्र न्यायालय तसेच हायकोर्टात अर्ज केला. मात्र, न्यायालयानं प्रत्येकवेळी तिचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर इंद्राणीने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.  खटला लवकर संपण्याची शक्यता नसल्याने आणि इंद्राणी साडेसहा वर्षांपासून तुरूंगात असल्याने सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. शुक्रवारी संध्याकाळी कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर इंद्राणीची  सुटका झाली.

जामीनासाठी ह्या अटी
सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करता अटी घातल्या आहेत. देशाबाहेर सीबीआय न्यायालयाच्या परवानगीविना जायचे नाही आणि पासपोर्ट सीबीआयकडे जमा करावा अशा प्रमुख अटी घालण्यात आल्या आहेत. जामिनावर सुटका झाल्यानंतर स्वत:चा निवासी पत्ता व संपर्क क्रमांकाचा सर्व तपशील सीबीआयला द्यायचा. तसेच त्यात बदल झाला तरी तो कळवायचा,  सरकारी पक्षाच्या साक्षीदारांवर दबाव टाकायचा नाही, अशीही अट घालण्यात आली आहे. सीबीआय न्यायालयातील खटल्याच्या सुनावणीला नियमितपणे हजेरी लावणेही इंद्राणीला बंधनकारक केले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

शीना बोराची हत्या 24 एप्रिल 2012 रोजी करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर राय याला बेकायदेशीर हत्या बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीत या हत्याकांडाचा 2015 मध्ये उलगडा झाला. इंद्राणीने आपला आधीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांना बरोबर घेऊन शिनाची हत्या केली. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट पनवेलजवळ 25 एप्रिल 2012 रोजी लावल्याचे समोर आले होते. शिना ही इंद्राणीच्या पहिल्या पतीपासूनची मुलगी होती. याप्रकरणी इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी यालाही  कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -