घरताज्या घडामोडीपूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या ५ महापालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या ५ महापालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Subscribe

मुंबईमधून चिपळूण, महाडला गेले होते ४०० कर्मचारी

कोकणातील चिपळूण येथे व रायगडमधील महाड येथे काही दिवसांपूर्वीच पूरस्थिती निर्माण होऊन दरड कोडळण्याच्या घटना घडल्या.त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तीय हानी झाली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने मुंबई महापालिकेने ४०० कर्मचारी व अधिकारी यांचे पथक, साधन, सामुग्रीसह पाठवले होते. त्यापैकी १४५ कर्मचारी मुंबईत परतले असून त्यांच्यापैकी ५ कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यांच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भातील माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

कोकण, रायगड व सांगली आदी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आला होता. तसेच, दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे अनेक घरे कोसळली. घराघरात पावसाचे पाणी शिरले होते. परिणामी अनेकांचे संसार उध्वस्त झाले. मोठी जीवित आणि वित्तीय हानी झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागात, दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या पूरग्रस्त लोकांसाठी राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने आपत्कालीन पथक, कामगार, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, पाणीपुरवठा, मलनि: सारण विभागाचे कर्मचारी आदीं ४०० जणांची छोटी, मोठी पथके आवश्यक मदत सामग्रीसह पूरग्रस्त, दुर्घटनास्थळी रवाना केली होती. त्यापैकी १४५ कर्मचारी मुंबईत परतले. त्यांची सेव्हन हिल रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता त्यांपैकी ५ कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने त्यांवर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -