घरमुंबईनिकृष्ट आईसक्रिमची विक्री; कांदिवलीत दुकानावर धाड

निकृष्ट आईसक्रिमची विक्री; कांदिवलीत दुकानावर धाड

Subscribe

तुम्ही खात असलेले आईसक्रिम निकृष्ट दर्जाचे तर नाहीये ना? याची चाचपणी करुन घ्या, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) करण्यात आले आहे.

तेल, दुधापाठोपाठ आता बाजारामध्ये नामांकित कंपन्यांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे आईसक्रिमही राजरोसपणे विकले जात असल्याचे उघड झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने नुकतेच कांदिवलीतील बॉम्बे कुल्फी एलएलपी दुकानावर छापा टाकून तब्बल ४ लाख ५३ हजार १०० रुपयांचे आईसक्रिम जप्त केले. यामुळे तुम्ही खात असलेले आईसक्रिम निकृष्ट दर्जाचे तर नाहीये ना? याची चाचपणी करुन घ्या, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) करण्यात आले आहे.

कादिंवली येथील चारकोपमधील बॉम्बे कुल्फी एलएलपी या दुकानात ५ फेब्रुवारीला एफडीएने टाकलेल्या छाप्यामध्ये नॅचरल आईसक्रिमचे ५०० ग्रॅम पॅकेट व आईसक्रिम स्लाईसचे १६०० ग्रॅम पॅकेट असा ४ लाख ५३ हजार १०० रुपयांचा निकृष्ट दर्जाचा माल जप्त करण्यात आला. चुकीचा ब्रॅण्ड आणि निकृष्ट दर्जाचा संशय असल्याने प्रशासनाने कारवाई केल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले. आईसक्रिमचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यानंतर दुकानदारावर कारवाई केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व उपनगरातील आईसक्रिमच्या दुकानांची येत्या काही दिवसात एफडीएकडून झाडाझडती केली जाणार आहे, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -