घरताज्या घडामोडीमुंबई हायकोर्टाने समीर वानखेडेंच्या वकिलांना सुनावले खडे बोल, राज्य सरकारच्या भूमिकेवरही व्यक्त...

मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडेंच्या वकिलांना सुनावले खडे बोल, राज्य सरकारच्या भूमिकेवरही व्यक्त केली नाराजी

Subscribe

उत्पादन शुल्क विभागाच्या तक्रारीनुसार ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात एनसीबीचे माजी विभागीय संचालक वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. समीर वानखेडे यांच्यावर नवी मुंबईतील सद्गुरू हॉटेल अँड बारचा परवाना मिळवण्यासाठी जाणूनबुजून आपले वय चुकीचे दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वानखेडेंच्या हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आला होता. काल, सोमवारी समीर वानखेडे यांनी हॉटेलचा परवाना रद्द करण्याविरोधात आणि दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. यामधील एका याचिकेवर सुनावणी देताना हायकोर्टाने वानखेडेंना खडे बोल सुनावले असून राज्य सरकारच्या भूमिकेवर नाराजीही व्यक्त केली आहे.

नक्की हायकोर्टात काय झाले?

मुंबईतील सद्गुरु हॉटेलचा परवाना मिळवण्यासाठी खोटे वय दाखवल्यामुळे ठाणे पोलिसांनी समीर वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल केला होता. याला आव्हान देण्यासाठी समीर वानखेडेंनी हायकोर्टात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान राज्य सरकारने आणि पोलिसांनी वानखेडेंना अटकेपासून दिलासा देण्यास तीव्र विरोध केला होता. तर राजकीय सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रसेच्या एका मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीविरोधात कारवाई केल्यामुळे हा सूड घेतला जात आहे, असा दावा वानखेडेंनी करत नवाब मलिकांचे नाव न घेता आरोप केला आहे. तसेच केंद्रीय तपासयंत्रणेचा अधिकारी तपासात सहकार्य करत असूनही अटकेची गरज काय? आणि वानखेडे चौकशीला आल्यावर अटक करणार नाही, अशी हमी देणार का? असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला केला आहे. शिवाय एकाबाजूला अनेक कैदी आणि आरोपींच्या अनेक याचिका प्रलंबित असून त्या ऐकायला आम्हाला वेळ पुरत नाहीये. मग अशा प्रकरणात राज्य सरकारची घाई का? इतर प्रकरणात राज्य सरकार का घाई दाखवत नाही? असेही हायकोर्टाने प्रश्न उपस्थितीत करून राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली. आता राज्य सरकारला दुपारी २.३० वाजेपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता हायकोर्टाकडून वानखेडेंना दिलासा मिळणार की नाही? याकडे पाहणे महत्त्वाचे असेल.

- Advertisement -

दुसऱ्या वानखेडेंचा बारचा परवाना रद्द केल्याविरोधातील याचिकेवर हायकोर्टाने सुनावणी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने वानखेडेंच्या वकिलांना संतप्त सवाल केला. हायकोर्ट म्हणाले की, ‘वानखेडेंनी काल याचिका सादर केल्या होत्या आज त्या बोर्डावर कशा आल्या? याचिकाकर्ते प्रतिभावंत व्यक्ती आहेत म्हणून त्यांना इथे झुकते माप दिले जाणार नाही. या याचिकेवर आजच्या आज सुनावणी घेतली नाही, तर आभाळ कोसळणार आहे का?,’ असा सवाल करत वानखेडेंच्या वकिलांना हायकोर्टाने छापले. दरम्यान उद्या वानखेडे ठाणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत.


हेही वाचा – भीमा कोरेगाव प्रकरणी काही दिवसातच शरद पवार आयोगासमोर जातील – नवाब मलिक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -