घरमुंबईमालाडच्या अप्पापाड्यातील लोकांशी साधला आयुक्तांनी संवाद

मालाडच्या अप्पापाड्यातील लोकांशी साधला आयुक्तांनी संवाद

Subscribe

आयुक्तांनी मालाड (पूर्व) परिसरातील आप्‍पापाडा, संत्री कंपाऊंड, प्रथमेश नगर, देवकी नगर, शिवशाही रहिवासी संघ, महेश्‍वर नगर आदी भागातील स्थानिकांशी संवाद साधला

मालाड भागात रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेत सोमवारी महापालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी या परिसरांचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्‍यान महापालिका आयुक्तांनी मालाड (पूर्व) परिसरातील आप्‍पापाडा, संत्री कंपाऊंड, प्रथमेश नगर, देवकी नगर, शिवशाही रहिवासी संघ, महेश्‍वर नगर आदी भागातील स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेतल्या. यावेळी त्यांनी येथील काही शौचालयांचीही पाहणीही केली.

मुंबईतील कोरोना रुग्‍णांची संख्‍या अधिक असणाऱ्या व आव्हानात्मक परिसर असणाऱ्या मालाड (पूर्व) प्रतिबंधित क्षेत्राचा महापालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी आज पायी पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्‍यान त्‍यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधण्‍यासह या भागात महापालिकेतर्फे पुरविण्‍यात येत असलेल्‍या नाग‍री सेवा-सुविधांची पाहणी केली. याच अनुषंगाने याप्रसंगी परिमंडळ – ४ चे उपायुक्‍त रणजित ढाकणे, ‘पी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त संजोग कबरे तसेच संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

‘पी/उत्तर’ विभागात कोरोना बाधित ३ हजार २६७ रुग्‍ण आतापर्यंत आढळले असून त्‍यापैकी १ हजार ४४२ रुग्‍ण बरे होऊन घरी गेले आहेत. या पाहणी दौऱ्यादरम्यान महापालिका आयुक्तांनी परिसरातील विविध सार्वजनिक शौचालयांना भेटी देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी करुन तेथील परिस्थिती जाणून घेतली. तसेच या सार्वजनिक शौचालयांमध्ये नियमितपणे दिवसातून ५ ते ६ वेळा ‘सॅनिटायझेशन’ करण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची मालाडमधील कुरार व्हिलेजमध्ये पाहणी

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची मालाडमधील कुरार व्हिलेजमध्ये पाहणी

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜೂನ್ 22, 2020

- Advertisement -

आयुक्तांनी मालाड (पूर्व) परिसरातील आप्‍पापाडा, संत्री कंपाऊंड, प्रथमेश नगर, देवकी नगर, शिवशाही रहिवासी संघ, महेश्‍वर नगर आदी भागातील स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेतल्या. त्‍याचबरोबर त्यांनी स्थानिक दुकानदार, व्यापारी, हॉटेलचालक, विविध व्‍यवसायिक यांच्‍याशीही सहज-संवाद साधला. प्रत्‍यक्ष फिल्डवर काय परिस्थिती आहे, हे समजावून घेण्‍यासाठी तसेच नागरिकांना मिळणाऱया सोयी-सुविधांची माहिती करुन घेण्‍यासाठी पायी पाहणी दौरे उपयुक्‍त ठरतात. त्‍याचबरोबर भविष्‍यातील नियोजनाच्‍या दृष्‍टीने नागरिकांच्‍या गरजा व महापालिकेकडून असलेल्‍या अपेक्षा समजावून घेण्‍यास या पाहणी दौऱ्याचा निश्चितच उपयोग होतो, असेही आयुक्तांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले.

लक्षणे असलेल्या रुग्णांनाच बेडची सुविधा

ज्‍या रुग्‍णांमध्‍ये लक्षणे आहेत, अशाच रुग्‍णांना रुग्‍णालयामध्‍ये खाटा (बेड) उपलब्‍ध करुन देण्‍याचे आदेश देत त्यानुसारच कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व परिमंडळातील सह आयुक्त तसेच उपायुक्तांना आणि विभागीय सहायक आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे सर्व रुग्णालयांची तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.


महापालिका कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुविधा बंद
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -