घरमुंबईमहापौरांचा पाहणी दौरा

महापौरांचा पाहणी दौरा

Subscribe

नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी बुधवारी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार संदीप नाईक यांच्यासह दिघा व ऐरोली विभागांचा पाहणी दौरा करून विविध नागरी सुविधांची पाहणी केली. या पाहणी दौर्‍यात त्यांनी दिघा ओ.एस.-1 भूखंडावर भेट देऊन दिघा विभागातील अधिकार्‍यांशी चर्चा केली व सुविधा कामांना गती देण्याचे सूचित केले. यावेळी त्यांनी दिघा नाका येथे ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतुकीचीही पाहणी केली. ऐरोली विभागात समतानगर व परिसरातील नागरिकांना समाधानकारक पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने त्याठिकाणी जलकुंभ बांधणेबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे ऐरोली नाका येथे अंडरपास बांधणेबाबत त्यांनी प्रत्यक्ष जागी भेट दिली. सेक्टर 2 येथील नागरी आरोग्य केंद्राची पाहणी करून ते कार्यान्वित करणे तसेच सेक्टर 3 येथील राजमाता जिजाऊ रूग्णालयास भेट देऊन महापौरांनी मौलिक सूचना केल्या. ऐरोली अग्निशमन केंद्राची पाहणी करून पुढे सेक्टर 15 येथील होल्डींग पाँडचीही त्यांनी पाहणी केली. दिवा येथील मच्छीमार्केटचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष जागेला भेट देऊन महापौरांनी संबंधित अधिकारीवर्गास कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -