घरताज्या घडामोडीबेस्ट कर्मचाऱ्यांसाठी १ हजार पंखे आणि २०० कुलर्स तातडीने देण्याचे निर्देश

बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी १ हजार पंखे आणि २०० कुलर्स तातडीने देण्याचे निर्देश

Subscribe

बेस्ट उपक्रमात कोरोनाची पर्वा न करता आपले प्राण धोक्यात घालून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालक, बसवाहक आणि परिवहन अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी यांच्यासाठी विश्रांतीगृहात १ हजार पंखे आणि २०० कुलर्स तातडीने
उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी बेस्टचे हंगामी महाव्यवस्थापक आणि पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांना एका पत्राद्वारे दिले आहेत.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे, असे असताना बेस्टचे वाहन चालक, वाहक, अभियांत्रिकी कर्मचारी हे जीवाचे रान करून अत्यावश्यक सेवेतील सरकारी, पालिका कर्मचारी यांची कामाच्या ठिकाणी बसद्वारे ने-आण करीत असतात.
मात्र दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना बेस्टच्या विश्रांतीगृहात अपेक्षित सेवा-सुविधा यांची कमतरता भासते.

- Advertisement -

२४ एप्रिल रोजी आपण स्वतः बेस्ट उपक्रमाच्या वडाळा, प्रतीक्षानगर, आणिक आणि वांद्रे आगाराला भेट दिली होती. मात्र त्या ठिकाणी सुरू असलेल्या अक्षम्य गलथानपणामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी केला आहे. तसेच, याबाबत अनेक कर्मचाऱ्यांकडून तक्रारी आल्या आहेत. त्यामुळेच आपण स्वतः कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहांना भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहांची मागील २ वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचे आणि त्या ठिकाणचे फॅन, कुलर नादुरुस्त अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याचे आशिष चेंबूरकर यांनी म्हटले आहे. त्यामुळेच, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहात १०००  पंखे आणि २०० कुलर्स तातडीने उपलब्ध करुन सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात यावा, असे निर्देश आशिष चेंबूरकर यांनी या पत्रातून दिले आहेत.


हेही वाचा – मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी  टाळण्यासाठी,अतिरिक्त आरक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -