घरमुंबईआज 'जागतिक ड्रग्ज मुक्त दिवस'

आज ‘जागतिक ड्रग्ज मुक्त दिवस’

Subscribe

व्यसन हे मानवी शरिरासाठी धोकादायक आहे, याची संपूर्ण माहिती असून काहीजणं व्यसन करणे थांबवत नाहीत.

ड्रग्ज आणि इतर आमली पदार्थांच्या सेवनाला विरोधकरण्यासाठी आज ‘जागतिक ड्रग्ज मुक्त दिवस’ म्हणून साजरा केला जातो. व्यसन हे मानवी शरिरासाठी धोकादायक आहे, याची संपूर्ण माहिती असून काहीजणं व्यसन करणे थांबवत नाहीत. आमली पदार्थांचे सेवन केल्याने माणूस चिंतेपासून दूर होतो, असा काहीजणांचा गैरसमज आहे. महत्वाचे म्हणजे, यात तरुण पिढीचा अधिक समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये मुले-मुलींची आकडेवारी सारखीच आहे. माहितीनुसार, हे मुले सुरुवातीला सिगारेट किंवा दारु यांसारख्या पदार्थांचे सेवन करतात. परंतु, काही दिवसानंतर दारु किंवा सिगारेट सेवनातून त्यांना समाधान मिळत नसल्यामुळे ते ड्रग्जसारख्या धोकादायक सेवनाचा पर्याय निवडतात. रुग्णालयात उपचारासाठी वापरले जाणाऱ्या अवैध औषधांचा ड्रग्ज म्हणून वापर केला जातो. ड्रग्जच्या सेवनासाठी अनेकजणं चुकीचा मार्ग निवडतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘युनायटेड नेशन्स विद ड्रग्ज अॅब्युज’ ही संस्था काम करतात.

View this post on Instagram

#WorldDrugDay #MyMahanagar

A post shared by My Mahanagar (@mymahanagarnews) on

- Advertisement -

‘युनायटेड नेशन्स विद ड्रग्ज अॅब्युज’ काय करते?

ड्रग्जचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ड्रग्जचे सेवन करणाऱ्या लोकांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे, या हेतूने युनायटेड नेशन्स विद ड्रग्ज अॅब्युज संस्थेची सुरुवात झाली आहे. ही संस्था ड्रग्ज कंट्रोलच्या समर्थनासाठी मोहीम सुरू करण्यासाठी सक्रियपणे सहभागी झाले आहेत. समाजातील लोकांना या मोहिममध्ये सक्रियपणे भाग घेण्यास प्रोत्साहित करतात. व्हिएतनाम, बोर्नियो आणि थायलंडसह अनेक देशांमध्ये ही संस्था कार्यरत आहे. तसेच अवैध ड्रग्सशी संबंधित धोक्यांविषयी जागरुकता वाढविण्यासाठी प्रचार करतात. एवढेच नव्हे तर, ही संस्था सार्वजनिक रॅलीज आणि जनसंपर्कातून संबधित लोकांशी संवाद साधतात.

यूएनओडीसीच्या सर्वेनुसार, जगभरात २०० दशलक्ष लोक कोकेन, कॅनाबीस, हेलुसीनोजेन्स, ओपियेट्स आणि सेडेटिव्ह हायफोटिक्ससारख्या अवैध औषधांचा वापर करीत आहेत. संयुक्त राष्ट्राने २६ जून १९८७ रोजी ‘जागतिक ड्रग्ज मुक्त दिवस’ साजरा करण्याच्या निर्णय घेतला होता. सयुक्त राष्ट्राने १९९८मध्ये या “युनायटेड नेशन्स विद ड्रग अॅब्युज ‘ या संस्थेची घोषणा केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -