Eco friendly bappa Competition
घर पालघर मुंबई, पालघरमध्ये आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सव; पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांची माहिती

मुंबई, पालघरमध्ये आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सव; पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांची माहिती

Subscribe

मुंबई : पर्यटनाला चालना देण्यासाठी, पारंपारिक कला आणि संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करुन देण्यासाठी तसेच गणेशोत्सवला आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी मिळावी म्हणून आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.  19 ते 28 सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे, पालघर आणि  रत्नागिरी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. (International Ganesha Festival in Mumbai Palghar Tourism Minister Girish Mahajans information)

हेही वाचा – आधी वंदू तुज मोरया… गणरायाच्या प्रतिष्ठापनेची सज्जता आणि शास्त्र

- Advertisement -

राज्यात पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनालयाद्वारे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव हा कला, सांस्कृतिक वारसा तसेच लोकांचे एकात्मतेचे दर्शन घडविण्याचे माध्यम आहे. पारंपारिक कला आणि सांस्कृतिक ठेवा या महोत्सवाच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

महोत्सवाच्या दरम्यान विविध राज्यातील पर्यटनाशी निगडीत भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, प्रवासी पत्रकार आणि समाजमाध्यम प्रभावक तसेच विदेशी वाणिज्य दूतावासाचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यांना मुंबई, पुणे, पालघर आणि रत्नागिरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच रत्नागिरीतील गणेश दर्शन तसेच सांस्कृतिक वैभव दाखविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – गुणेश तू गणेश तू… बाप्पासाठी पर्यावरणस्नेही मखर अन् आरास

सदर महोत्सवांतर्गत गेटवे ऑफ इंडिया येथे श्री गणेशाच्या विविध स्वरुपांवर केंद्रीत विशेष सांस्कृतिक केंद्रांची उभारणी, वाळूशिल्प, मॉझेक आर्ट, स्क्रॉल आर्टचे प्रदर्शन, गेटवे ऑफ इंडियाच्या भव्य दर्शनी भागावर प्रोजेक्शन मॅपींगच्या माध्यमातून देशभक्तीपर यशोगाथा कथन करणारे कार्यक्रम, महाराष्ट्राचे पारंपारिक आदिवासी वारली संस्कृतीचे दर्शन घडविणारे वारली कलेचे कार्यशाळा, विविध कारागिरांद्वारे निर्मित हस्तकला वस्तुचे कलादालन, पारंपारिक कला आणि लोककला संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम दहा दिवसीय गणेशोत्सव महोत्सवांतर्गत विविध ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

- Advertisment -