घरमुंबईरायगड काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती

रायगड काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती

Subscribe

आदित्य व्हिला फार्मवर लगबग

राज्य विधानसभेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशानुसार आज १ जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ही माहिती रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार माणिकराव जगताप यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड, श्रीवर्धन, अलिबाग, पेण, कर्जत, उरण आणि पनवेल विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी राम हरि रूपनवर व सुरेश कुर्‍हाडे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ते उमेदवारांच्या प्रदीर्घ मुलाखती घेऊन अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठविणार आहेत. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आणि निवडणूक समिती त्यावर अंतिम निर्णय घेईल, अशी जगताप यांनी माहिती दिली. मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल तालुक्यातील चिंचवण येथे रायगड जिल्हा कॉग्रेसचे सरचिटणीस अरविंद सावळेकर यांच्या आदित्य व्हिला फार्म हाऊसवर मुलाखतीसाठी महत्वाच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -