Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी कथित एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी

कथित एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी

Subscribe

झोपडपट्टी पुनवर्सन योजनेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची शुक्रवारी दादर पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली आहे. शनिवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मुंबई : झोपडपट्टी पुनवर्सन योजनेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची शुक्रवारी दादर पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली आहे. शनिवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. किशोरी पेडणेकर यांच्या चौकशीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Investigation of Mumbai Former Mayor Kishore Pednekar in alleged SRA scam)

किशोरी पेडणेकर यांनी भाजपासह एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांच्यावर सुडाचे राजकारण सुरू असल्याचे बोलले जाते. जूनमध्ये दादर पोलिसांनी एसआरए घोटाळ्याप्रकरणी एक गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात काही संशयिताची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. चौकशीनंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यात महानगरपालिकेचा एका कर्मचार्‍यासह किशोरी पेडणेकर यांचा जवळचा सहकारी होता. त्यांच्या चौकशीत किशोरी पेडणेकर यांचे नाव आले होते. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी हजर राहण्यास साांगण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी त्या दादर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहिल्या होत्या.

- Advertisement -

याच प्रकरणात त्यांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती. त्यांना शनिवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. किशोरी पेडणेकर यांनी एसआरए प्रकल्पात सहा फ्लॅट तसेच काही गाळ्यांचा अपहार केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या आरोपानंतरच किशोर पेडणेकर यांची चौकशी करण्यात आल्याचे बोलले जाते. एसआरए प्रकल्पात नऊजणांना फ्लॅटचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले होते. मात्र पैसे घेऊन त्यांना फ्लॅट देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी दादर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दादर पोलिसांनी फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा नोंदविला होता.


हेही वाचा – मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ, आव्हाड वगळता अनेक माविआ नेत्यांच्या सुरक्षेत कपात

- Advertisement -
- Advertisement -
Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -