Homeक्राइमFraud : आयफोनच्या नावाने फसवणूक करणार्‍या त्रिकुटाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

Fraud : आयफोनच्या नावाने फसवणूक करणार्‍या त्रिकुटाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

Subscribe

स्वस्तात आयफोन देण्याच्या नावाने एका तरुणाची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली.

मुंबई : स्वस्तात आयफोन देण्याच्या नावाने एका तरुणाची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. इम्रान रिझवान अन्सारी, रिझवान वसी अहमद अन्सारी आणि लक्ष्मण मच्छिंद्र गोरे अशी या तिघांची नावे आहेत. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर हे तिघेही दीड वर्षांपासून वॉण्टेड होते. या तिघांनाही पुढील चौकशीसाठी आंबोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत आहेत. (iphone fraud trio arrested mumbai crime branch has taken action)

या प्रकरणातील तक्रारदार मालाड येथे राहतो. तो अंधेरीतील एका खासगी कंपनीत तो कामाला आहे. गेल्या वर्षी त्याला ओएलएक्सवर आयफोनची एक जाहिरात दिसली होती. ऍपल कंपनीचा आयफोन 14 प्रो स्वस्तात मिळत असल्याने त्याने तिथे संपर्क साधला होता. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्याला 63 हजारांमध्ये आयफोन देण्याची तयारी दर्शवली. त्याला एका बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने संबंधित बँक खात्यात लागलीच पैसे ट्रान्स्फर केले. मात्र या व्यक्तीने त्याला बोगस फोन पाठवून त्याची फसवणूक केली. या घटनेनंतर त्याने आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी समांतर तपास करत होते.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : बुद्धी गमावलेल्या महायुतीच्या मंत्र्यांकडून…मिनी पाकिस्तान मुद्द्यावरून वडेट्टीवार भडकले

तपासादरम्यान, प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धारावी आणि डोंबिवली येथून इम्रान अन्सारी, रिझवान अन्सारी आणि लक्ष्मण गोरे या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. त्यानंतर या तिघांनाही अटक करून पुढील कारवाईसाठी आंबोली पोलिसांकडे सोपविण्यात आले.

तपासात इम्रान आणि रिझवान हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. या आरोपींच्या मोबाईलसह बँक खात्याची माहिती सायबर पोर्टलवरुन घेतली असता त्यांच्या बँक खात्यात मुंबईसह गुजरात, कर्नाटक, उत्तरप्रदेश, दिल्ली, कोलकाता, राजस्थान, मिरा-भाईंदर येथून अशा प्रकारच्या एकूण सतरा तक्रारी अर्ज मिळाल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा – Suresh Dhas VS Prajakta Mali : अखेर धस नरमले…प्राजक्ता माळीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी


Edited by : Ashwini A. Bhatavdekar