घरक्रीडापृथ्वी शॉचं मुंबईतील अलिशान घर पाहिलत का? किंमत वाचून व्हाल थक्क

पृथ्वी शॉचं मुंबईतील अलिशान घर पाहिलत का? किंमत वाचून व्हाल थक्क

Subscribe

क्रिकेटमध्ये अपयशी फलंदाजीमुळे भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ चर्चेत आहे. सामन्यात उत्कृष्ट फलंदाजीसाठी पृथ्वी शॉ सतत सराव करताना पाहायला मिळत आहे. मात्र एकीकडे त्याची फलंदाजी अपयशी ठरत असली तरी, बाहेरच्या जगात तो उत्तम प्रगती करत आहे.

क्रिकेटमध्ये अपयशी फलंदाजीमुळे भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ चर्चेत आहे. सामन्यात उत्कृष्ट फलंदाजीसाठी पृथ्वी शॉ सतत सराव करताना पाहायला मिळत आहे. मात्र एकीकडे त्याची फलंदाजी अपयशी ठरत असली तरी, बाहेरच्या जगात तो उत्तम प्रगती करत आहे. महागडी कारच्या खरेदीनंतर पृथ्वी शॉने आता मुंबईत अलिशान घर घेतलं आहे. त्याच्या या घराची किंमत कोटींच्या घरात आहे.

‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ याच उत्तम उदाहरण पृथ्वी शॉ याने दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉनंही त्याचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. पृथ्वी शॉनं वांद्रे रेक्लेमेशन, मुंबई येथे एक प्रीमियम निवासी अपार्टमेंट खरेदी केलं आहे. त्याची किंमत साडे दहा कोटी रुपये आहे.

- Advertisement -

इंडेक्स टॅपच्या अहवालानुसार, पृथ्वी शॉनं खरेदी केलेल्या प्रीमियम अपार्टमेंटचे कार्पेट क्षेत्र 2209 स्क्वेअर फूट आहे. तर टेरेस 1654 स्क्वेअर फूट आहे. त्याचे अपार्टमेंट प्रोजेक्ट 81 ऑरिएट येथे आहे. त्याच्या मुद्रांक शुल्कावर 52.50 लाख रुपये खर्च झाले आहेत.

पृथ्वी शॉ चार वर्षाचा असताना त्याच्या आईचं निधन झालं. यानंतर त्याच्या वडिलांनी त्याची काळजी घेतली आणि त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केले. पृथ्वी शॉला क्रिकेटर बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्यांचा व्यवसाय सोडला. पृथ्वी शॉ भविष्यात भारतीय संघासाठी खेळून देशाचं नाव मोठं करेल, अशी त्यांना खात्री होती. पृथ्वी शॉने वयाच्या 18 व्या वर्षी भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं होतं. दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्ध राजकोट येथे खेळल्या गेलेल्या पदार्पणाच्या सामन्यात त्यानं शतक झळकावलं होतं.

- Advertisement -

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ सर्वात तरूण भारतीय खेळाडू ठरला. भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी दिल्लीच्या संघानं त्याला रिटेन केलं होतं.


हेही वाचा – IPL ‘या’ दोन बॉलसाठीही हवाय डीआरएस; डॅनियल व्हिटोरी, इम्रान ताहिरची मागणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -