Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई गँगस्टर इकबाल मिर्चीच्या कुटुंबाची वरळीतील संपत्ती ईडीकडून ताब्यात

गँगस्टर इकबाल मिर्चीच्या कुटुंबाची वरळीतील संपत्ती ईडीकडून ताब्यात

Related Story

- Advertisement -

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी गँगस्टर इकबाल मिर्ची याच्या कुटुंबाच्या नावावर असलेली वरळीतील सीजे हाऊसमधील संपत्ती ईडीने ताब्यात घेतली आहे. सीजे हाऊसचे बांधकाम केंद्रातील एका नेत्याशी संबंधित होते. या नेत्याची ईडीकडून या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती.

मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या २०० कोटींच्या व्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्ह्या प्रकरणी ईडीने २०१९ मध्ये इकबाल मिर्ची याचे कुटुंब आणि इतरांवर मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकणात मिर्ची याचे दोन सहकारीसह तीन बांधकाम व्यावसायिक याना देखील ईडीने अटक केली होती.

- Advertisement -

मुंबईतील वरळी भागात सी व्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मॅन्शन हे १५३७ चौरस मीटरची जागा खरेदी करताना या जागेचा गैरव्यवहार झाला होता. एका ट्रस्टच्या नावावर असलेली ही मालमत्ता इकबाल मिर्चीच्या नावावर करून देण्यासाठी तसेच मालमत्ता खरेदी करताना हारून आलम युसूफ आणि रणजितसिंग बिंद्रा यांची महत्वाची भूमिका होती. इकबाल मिर्ची याची पत्नी हाजरा मेनन आणि तिची दोन मुले असिफ आणि जुनैद यांनी सिजे हाऊसमध्ये दोन मजले खरेदी केले होते आणि एका खासगी कंपनीला भाडेतत्वावर देण्यात आले होते. ईडीने त्या कंपनीला विनंती करून ती जागा ताबडतोब खाली करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानंतर गुरुवारी त्याचा ताबा ईडीने घेतला आहे.

यापूर्वी ईडीने इक्बाल मिर्चीच्या एकूण ७ मालमत्ता जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये पाचगणी, महाबळेश्वरमधील एक हॉटेल, एक निर्माणाधीन हॉटेल, एक सिनेमा हॉल, १ फार्म हाऊस, २ बंगले आणि साडेतीन एकर जागेचा समावेश आहे. २०१३ मध्ये इकबाल मिर्ची याचा लंडनमध्ये मृत्यू झाला आहे. इकबाल मिर्चीची पत्नी आणि दोन मुलांविरूद्ध इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस बजावली आहे. इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा आणि त्याचे दोन मुलगे आसिफ आणि जुनैद हे ब्रिटनमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी, मुंबईच्या न्यायालयाने मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात इक्बाल मिर्चीच्या कुटुंबातील तीन सदस्यांना (पत्नी आणि दोन मुलगे) फरारी घोषित केले होते.

- Advertisement -