घरताज्या घडामोडीहिंदमाता परिसर ३० दिवसानंतर होणार तुंबईमुक्त, अंधेरी सबवे पावसाच्या दिवसात बंद -...

हिंदमाता परिसर ३० दिवसानंतर होणार तुंबईमुक्त, अंधेरी सबवे पावसाच्या दिवसात बंद – इक्बाल सिंह चहल

Subscribe

पंम्पिंग स्टेशनच्या कामाला २ वर्षांचा कालावधी लागणार असल्यामुळे या भागातील नागरिकांना २ वर्ष पावसाळ्याच्या दिवसात सबवे बंद करण्यात आला

मुंबईसर उपनगरांत सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. या भागाचा मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आढावा घेतला आहे. मुंबईसह उपनगरांत १४० ते १६० मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे सकाळी ९ ते १० या एका तासात ६० मिलीमीटर पाऊस पडला आहे. वर्षानुवर्षेची परीभाषा आहे की, २४ तासात जर ६५ मिलीमीटरवर पाऊस पडला तर आपण त्याला अतिवृष्टी म्हणतो मग त्यात पंचनामे वगैरै करायला घेतो परंतु आज एका तासात ६० मिलीमीटर पाऊस पडला आहे. म्हणून सायन आणि चुनाभट्टी भागात ट्रॅकवर पाणी आले आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.

मुंबईत आढावा घेतला आहे. यामध्ये दहिसर सबवे, सायन आणि चुनाभट्टीमध्ये ट्रॅकवर पाणी आले आहे. याशिवाय मुंबईत इतर कोणत्याही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूकळ विस्कळीत झाली नाही आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे पावसाळ्यातील दिवसांमध्ये हा सबवे बंद करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अंधेरी सबवेसाठी कायमचा उपाय म्हणजे मोगरा पंम्पिंग स्टेशन आहे. पंम्पिंग स्टेशनच्या कामाला २ वर्षांचा कालावधी लागणार असल्यामुळे या भागातील नागरिकांना २ वर्ष पावसाळ्याच्या दिवसात सबवे बंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

हिंदमाता परिसर होणार तुंबईमुक्त

हिंदमाता परिसरात ४ फूट उंचीचे एलिव्हेडेट रोड तयार करण्यात आले आहेत. यामुळे प्रथमच मुंबईतील हिंदमाता परिसरामध्ये वाहतूक खोळंबली नाही किंवा थांबवण्यात किंवा वळवण्यात आली नाही आहे. हिंदमातामध्ये १४० कोटींचा भूमिगत प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. यामुळे हिंदमातामध्ये पाणी साचण्याचे प्रमाण कमी होणार आहे. यासाठी दीड किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. केंद्र सरकारकडून १० दिवसांपुर्वी या प्रकल्पाला मान्यता मिळाल्याने ३० दिवसांता हा प्रकल्प पुर्ण करण्यात येणार आहे. यामुळे हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचणार नाही अशी माहिती आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.

- Advertisement -

हिंदमाता परिसरामध्ये ३० मिली पाऊस पडला की लगेच पाणी साचत होते परंतु आता तिथे पाणी साचत नाही आहे. हा प्रकल्प करण्यासाठी केंद्र सरकारकडे जानेवारीपासून परवानगी मागत होतो परंतु आता प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे जूलै-ऑगस्टच्या पावसात हिंदमाता परिसरात पाणी साचणार नाही असे आश्वासन आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहे. रेल्वेच्या भागातही पालिकेने नालेसफाई केली आहे. कल्व्हर्टर्सची सफाई पालिकेच्या यंत्रणांनी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -