घरमुंबई७२ हजार रिक्त पदांच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक

७२ हजार रिक्त पदांच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक

Subscribe

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भरतीच्या नावाखाली सरकार बेरोजगारांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला आहे.

राज्यातील नोकऱ्यांमध्ये ७२ हजार पदेच उपलब्ध नसताना दोन वर्षात दीड लाख पदे भरण्याची घोषणा करुन सरकार बेरोजगारांची फसवणूक करीत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. राज्यात पावसाळी अधिवेशनात विविध पदांची भरती, जीएसटी, उद्योग, गृहनिर्माण क्षेत्र, शाश्वत विकास, मुंबईतील घरे अशा विविध मुद्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विविध प्रश्न, समस्या पुढे करत विरोधकांनी सरकारला घाम फोडला आहे.

सरकारवर चौफेर हल्ला

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विविध प्रश्न उपस्थित करत सरकारने निवडणूकांदरम्यान जनतेला दिलेल्या विविध आश्वासनांची पोलखोल केली. विधानपरिषदेत अर्थसंकल्पावर बोलताना धनंजय मुंडे यांनी सरकारची ढासळलेली आर्थिक परिस्थिती, दुष्काळ, सामाजिक आरक्षण, यासह विविध समाज घटक आणि विदर्भ कोकणासह संपूर्ण राज्याचे प्रश्न मांडताना सरकारवर चौफेर हल्ला चढविला. विविध पदांची भरती, जीएसटी, उद्योग, गृहनिर्माण क्षेत्र, शाश्वत विकास, मुंबईतील घरे अशा विविध मुद्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.

- Advertisement -

भरती प्रक्रियेची माहिती द्या

दोन वर्षात दीड लाख पदे भरणार असून तत्पूर्वी ७२ हजार पदांची मेगा भरती करणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेतील उत्तरात ४ हजार पदे भरल्याचे सांगितले. या वेगाने ही पदे भरण्यास १० ते १२ वर्षे लागतील. त्यामुळे गेल्या वर्षात कोणकोणत्या विभागाची एकूण किती पदांची भरती केली? तसेच आजपर्यंत किती पदांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे, याची माहिती सरकारने द्यावी अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -