घरमुंबईपूरग्रस्तांसाठी जे. जे. हॉस्पिटलची साथ

पूरग्रस्तांसाठी जे. जे. हॉस्पिटलची साथ

Subscribe

पश्चिम महाराष्ट्रात आलेला पूर आता ओसरला आहे. पूर जरी ओसरला असला तरी आता आरोग्यविषयक वाढलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक आरोग्य संस्था पुढे सरसावल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात आलेला पूर आता ओसरला आहे. पूर जरी ओसरला असला तरी आता आरोग्यविषयक वाढलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक आरोग्य संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यात आता जे. जे. हॉस्पिटलकडूनही पुढाकार घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने जे. जे. हॉस्पिटलतर्फे २ ट्रक भरुन औषधांचा साठा कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. या औषधांमध्ये प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जुलाब, अतिसार, कॉलरा अशा आजारांसाठी आय. वी. फ्लूइड्स म्हणजेच सलाईनसारखी औषधे पाठवण्यात आली. त्याचप्रमाणे, अनेक आजारांवर उपयोगी पडणाऱ्या मेट्रोजिल औषधं देखील पाठवण्यात आलं आहे.

J. j hospital
जे. जे. हॉस्पिटल

पूरानंतर पसरलेल्या चिखलाचे ढिग, मरून पडलेली जनावरे, अस्वच्छता अशा अनेक गोष्टींमुळे संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका ओळखून ऑगमेंटीनसारखे प्रभावी अँटिबायोटीकदेखील मुबलक प्रमाणात पाठवण्यात आले. या सगळ्या औषधांची जुळवाजुळव करण्यात हॉस्पिटलचे डॉक्टरांनी बरीच मदत केली असल्याचे जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे तेथील परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर हॉस्पिटलकडून तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम पाठवण्यासाठी निर्णय घेतला जाणार असल्याचेही डॉ. चंदनवाले यांनी सांगितले. या पथकात मेडिसीन, पीएसएम (रोगप्रतिबंधक शास्त्र), मनोविकार तज्ज्ञ आणि इतर डॉक्टरांचा समावेश असेल. पुराच्या पाण्यामुळे साथीचे अनेक रोग पसरण्याची शक्यता आहे. तसेच, त्या भागातील वैद्यकीय सेवा सध्या कोलमडली असताना अनेक रुग्णांना उपचार घेण्यासाठी तिथल्या परिस्थितीप्रमाणे ही टीम उपचार करेल. शिवाय, खचलेले मनोबल वाढवण्यासाठी मनोविकारतज्ज्ञ देखील या पथकात असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -