घरमुंबईस्मशानातील कर्मचाऱ्याने मिळवली 'लॉ'ची पदवी!

स्मशानातील कर्मचाऱ्याने मिळवली ‘लॉ’ची पदवी!

Subscribe

जगदीश नगरकर हे पालिकेचा कारकुन म्हणून स्मशानात मृत्यूची नोंद करण्याचे काम करतात. नुकत्याच विद्यापीठात पदवीदान समारंभात त्यांच्या या यशाचे कौतुक करत पदवी बहाल करण्यात आली.

शिक्षणाला कोणतेही वय नसते असे म्हणतात, अशाच एका ४९ वर्षाच्या व्यक्तीने स्मशानात पेटनाऱ्या प्रकाशात अभ्यास करून विधी शाखा (Law) ची पदवी मिळवली आहे. जगदीश नगरकर हे पालिकेचा कारकून म्हणून स्मशानात मृत्यूची नोंद करण्याचे काम करतात. नुकत्याच विद्यापीठात पदवीदान समारंभात त्यांच्या या यशाचे कौतुक करत पदवी बहाल करण्यात आली.

कसा आहे प्रवास?

जगदीश नगरकर यांनी १९८९ साली स्मशानभूमीत कामाला सुरुवात केली. कुटुंबाचा सर्व कार्यभार आपल्या खांद्यावर असताना त्यांनी २००५ साली वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केली. नगरकर २०१७ मध्ये परळच्या स्मशानभूमीत कार्यरत होते. नगरकरांनी आपले ध्येय निश्चित करून २०१४ साली त्यांनी वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विधी शाखेसाठी प्रवेश घेतला. स्माशानभूमीत काम करताना सतत बदल्या होत असत. या पदवीसाठी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर ते २०१९ पर्यंत देवनार स्मशानभूमीत कार्यरत होते तेथेच त्यांनी अभ्यासाला सुरूवात केली.सकाळी लवकर उठून दोन तास अभ्यास करायचा आणि कामे उरकून झाल्यावर दोन तास असा अभ्यास त्यांनी सुरू केला.

- Advertisement -

अभ्यासासाठी स्मशानभुमीत योग्य वातावरण 

स्मशानभूमीत मृत्यूची नोंद करण्यासाठी कामाला असलेल्या जगदीश यांनी अनेकदा अभ्यास करताना शांतता आणि एकाग्रता हवी यासाठी मृतदेहाच्या पेटत्या अग्नीच्या प्रकाशात त्यांनी अभ्यास केला. यावेळी ‘अभ्यास करण्यासाठी पोषक असणारी शांतता स्मशानभूमीव्यतिरिक्त कुठे मिळत नाही’, असे मत जगदीश नगरकर यांनी व्यक्त केले आहे. या अशा अथक प्रयत्नानंतर जगदीश नगरकरांना २०१९ मध्ये विधी शाखेची पदवी मिळाली आहे. तसेच आपल्या प्रमाणे इतर चतुर्थ श्रेणी कामगारांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांना शिकवायचे आहे असे ते म्हणाले आहेत.


हेही वाचा- करोना व्हायरसमुळे मोदी यंदा खेळणार नाहीत होळी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -