Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई जमील शेख हत्या प्रकरण : राष्ट्रवादीच्या नजीब मुल्लांचे नाव असल्याने लक्ष घालावे

जमील शेख हत्या प्रकरण : राष्ट्रवादीच्या नजीब मुल्लांचे नाव असल्याने लक्ष घालावे

राज यांची शरद पवारांकडे मागणी

Related Story

- Advertisement -

मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात ठाण्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक नजीब मुल्ला यांचे नाव आले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली असल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेण्याची मागणी राज यांनी केली असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही ते भेट घेणार आहेत. असे राजरोसपणे खून पडायला लागले, तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही.पवारसाहेब, दुसर्‍याचे हात बांधलेले नसतात, खुनाचे उत्तर खुनाने चांगले दिसणार नाही’, अशा शब्दात राज यांनी संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणावर मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांना संताप अनावर झाला. माझे पक्षातील सहकारी जमील शेख यांची हत्या झाली. या हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून उत्तर प्रदेशपर्यंत तपास करण्यात आला. यावेळी काही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी कबुली जबाब दिला असून, यात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्लांचे नाव आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची प्रेस नोट आहे. त्यामध्ये नजीब मुल्लांचे नाव आहे.

- Advertisement -

नजीब मुल्ला यांनीच जमील शेख यांची हत्या करण्याची सुपारी दिली होती, असे या प्रेस नोटमध्ये म्हटलेले आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक दिवसाढवळ्या लोकांना मारत आहेत. याच नजीब मुल्लांचे नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आले होते. ती केसही रफादफा झाली. आता पुन्हा नाव आले आहे. आता राज्य सरकार काय करतेय हे पाहतोय, असे राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -